गर्भश्रीमंत बार्सिलोनाचे मानधन ३० कोटी युरोंनी कमी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

कोरोना आक्रमणाचा फटका युरोपातील गर्भश्रीमंत फुटबॉल क्‍लबना बसत आहे. त्यामुळे खेळाडूंच्या एकंदरीत मानधनात बार्सिलोना ३० कोटी युरोची कपात करणार 
आहे.  बार्सिलोना आगामी मोसमात खेळाडूंच्या मानधनावर ३८ कोटी २७ लाख युरो खर्च करु शकेल.

माद्रिद : कोरोना आक्रमणाचा फटका युरोपातील गर्भश्रीमंत फुटबॉल क्‍लबना बसत आहे. त्यामुळे खेळाडूंच्या एकंदरीत मानधनात बार्सिलोना ३० कोटी युरोची कपात करणार 
आहे.  बार्सिलोना आगामी मोसमात खेळाडूंच्या मानधनावर ३८ कोटी २७ लाख युरो खर्च करु शकेल. गेल्या मोसमात हीच मर्यादा ६७ कोटी १४ लाख युरो होती. रेयाल माद्रिदची मर्यादा ६४ कोटी १० लाखांवरून ४६ कोटी ८५ लाख युरोपर्यंत कमी करण्यात आली. ॲटलेटिको माद्रिदची  कपात १३ कोटी १८ लाख आहे. 

स्पॅनिश लीगमधील आघाडीचे वीस संघ खेळाडूंच्या मानधनावर या मोसमात एकंदर २ अब्ज ३३ कोटी युरो खर्च करू शकतील. ही रक्कम गेल्या मोसमाच्या तुलनेत ६१ कोटी १० लाखनी कमी आहे. क्‍लबच्या मानधन रकमेत खेळाडूंसह मार्गदर्शक, अकादमी खेळाडूही 
असतात.  बार्सिलोना,  रेयालने खेळाडूंच्या मानधन कपातीची चर्चा सुरू केली. क्‍लबना तिकीटविक्री, क्‍लब शॉप, संग्रहालयाने चांगले उत्पन्न मिळते. बंदिस्त स्टेडियममधील लढतींमुळे हे उत्पन्न बंद झाले. त्यामुळे बार्सिलोनाने लुईस सुआरेझ, आर्तुरो विदाल, इवान राक्तीक यांची विक्री केली आहे. रेयालने चाळीस वर्षांत प्रथमच एकाही खेळाडूची खरेदी केली नाही.

संबंधित बातम्या