गर्लफ्रेंड ईशासमोर पंतने घेतला अप्रतिम झेल, तर रसेलला केले स्टम्प आऊट

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने विकेटकीपिंगवर गाजवले वर्चस्व
गर्लफ्रेंड ईशासमोर पंतने घेतला अप्रतिम झेल, तर रसेलला केले स्टम्प आऊट
Rishabh Pant catchTwitter

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या 41 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) वर्चस्व गाजवले. पंतने विकेटच्या मागे शानदार कामगिरी केली, त्याने एक शानदार झेल टिपण्यासोबतच आंद्रे रसेललाही यष्टीचीत केले. (Rishabh Pant catch)

पंतने पहिला झेल घेतला

ऋषभ पंतने डावाच्या 14व्या षटकात कुलदीप यादवच्या चेंडूवर कोलकाता कर्णधार श्रेयस अय्यरचा शानदार झेल घेतला. श्रेयसला थर्डमॅन क्षेत्रात ऑफ-स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू खेळायचा होता, पण चेंडू बॅटला लागून विकेटच्या मागे गेला. तिथे असलेल्या पंतने मैदानाच्या काही सेंटीमीटर आधी चेंडूचा ताबा घेतला. पंतचा हा झेल पाहून श्रेयसही (Shreyas Iyer) हैराण झाला.

Rishabh Pant catch
वेंकटेश अय्यरची IPL 2022 मधील कामगिरी लाजिरवाणी, विश्वचषक संघातून पत्ता कट

यानंतर पंतने 14व्या षटकातच दोन चेंडूंनंतर अष्टपैलू रसेललाही यष्टीचीत केले. रसेल चायनामनला पुढे जाऊन कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळायचा होता. मात्र, यष्टिरक्षक ऋषभ पंत चेंडू पूर्णपणे पकडू शकला नाही. पण त्याच्या ग्लोव्हमधून चेंडू पडूनही तो स्टंपला लागला आणि रसेल क्रीजच्या बाहेर गेला.

ईशा नेगी पंतला चीअर करताना दिसली

कोलकाता विरुद्धच्या सामन्यादरम्यान ऋषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगी आणि त्याची बहीण साक्षी पंतही मॅच एन्जॉय करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचल्या होत्या. ईशा नेगी आणि साक्षी पंत एकत्र स्टेडियममध्ये बसून एकमेकांशी बोलत होत्या. ऋषभ पंत आणि ईशा नेगी पाच वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. 2020 च्या सुरुवातीला ऋषभ पंतने सोशल मीडियावर ईशा नेगीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोच्या माध्यमातून पंतने सर्व जगासमोर खुलेपणाने आपले प्रेम व्यक्त केले होते.

Rishabh Pant catch
इशा वहिनी DCचे नशीब घेऊन आली, ऋषभ पंतच्या गर्लफ्रेंडचे युजर्सनी केले कौतूक

नितीश राणाने अर्धशतक ठोकले

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) 20 षटकांत 9 गडी गमावून 146 धावा केल्या. नितीश राणाने 34 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 57 धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने 42 आणि रिंकू सिंगने 23 धावांचे योगदान दिले. दिल्ली कॅपिटल्ससाठी, कुलदीप यादवकडे सर्वाधिक चार आणि मुस्तफिझूर रहमानकडे तीन खेळाडू होते. प्रत्युत्तरात दिल्लीने सहा चेंडू राखून 150/4 धावा करून विजय मिळवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com