पोर्तुगाल स्टार रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडमध्ये आला; पण किती वर्षे खेळणार?

मँचेस्टर युनायटेडने रोनाल्डोला दोन वर्षांसाठी 25 मिलीयन युरो इतकी मोठी रक्कम मोजली आहे.
पोर्तुगाल स्टार रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडमध्ये आला; पण किती वर्षे खेळणार?
Cristiano RonaldoDainik Gomantak

पोर्तुगालचा (Portugal) स्टार फुटबॉलपटू (Footballer) ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) 12 वर्षांनंतर जुन्या क्लब मँचेस्टर युनायटेडमध्ये (Manchester United Club) परतला आहे. क्लबने रोनाल्डोसोबत दोन वर्षांचा करार केला आहे. इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडने मंगळवारी यासंदर्भातील अधिकृत घोषणा केलीये. नियमावलीचे पालन करुन हा करार आणखी एका वर्षासाठी वाढवण्यासही उत्सुक आहोत, असा उल्लेखही क्लबने आपल्या निवेदनातून केलाय.

रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडमध्ये सामील झाल्याचे या अगोदरच स्पष्ट झाले होते. क्लबने त्याला किती वर्षांसाठी करारबद्ध केलंय याची माहिती अधिकृतरित्या समोर आली नव्हती. ब्रिटिश आणि इटालियन प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, मँचेस्टर युनायटेडने रोनाल्डोला दोन वर्षांसाठी 25 मिलीयन युरो इतकी मोठी रक्कम मोजली आहे.

Cristiano Ronaldo
Goa Sports: एफसी गोवा संघात ऑस्ट्रेलियन बचावपटू

रोनाल्डो जुव्हेंटस क्लबकडून केवळ तीन वर्ष खेळला. 2018 मध्ये तो जुव्हेंटसच्या ताफ्यात सामील झाला होता. या क्लबने 100 मिलियन युरो (जवळपास 8 अब्जच्या घरात) मध्ये त्याच्याशी करार केला होता. आता 12 वर्षानंतर तो पुन्हा एकदा आपल्या जुन्या क्लबमध्ये परतला आहे. 2003 ते 2009 पर्यंत तो मँचेस्टर युनायटेडचा भाग होता. त्याच्या प्रतिनिधीत्वाखाली क्लबने आठ प्रमुख ट्रॉफी जिंकल्या होत्या. त्याने 2003 मध्ये मँचेस्टर युनायटेडसह त्याच्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीला सुरुवात केली होती.

Cristiano Ronaldo
Indian Super League: सेरिनियोचा एफसी गोवास ‘गुडबाय’

क्रिस्टियानो रोनाल्डोने क्लब सोडल्यानंतर जुवेंट्सने रोनाल्डोच्या जागी किनची निवड केल्याची घोषणा केलीये. क्लबने मंगळवारी सांगितले की मोईस कीन एव्हर्टन दोन वर्षांच्या करारावर संघात पुन्हा करारबद्ध झालाय. जुवेंटस दोन हंगामात इटालियन फॉरवर्डसाठी 70 लाख युरो (जवळपास 6 कोटी) देईल, तर त्याला संघात कायमस्वरूपी जोडण्यासाठी क्लबला 2 कोटी 80 लाख युरो (2 अब्ज रुपयांहून अधिक) रक्कम मोजावी लागेल. किनने 2016 मध्ये जुवेंट्स येथे आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली होती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com