थॉमस-उबर करंडक खेळणे किती सुरक्षित? साईना नेहवालने व्यक्त केली भीती

वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

कोरोनाचे संकट भयावह रूप कायम ठेऊन आहे, अशा परिस्थितीत पुढील महिन्यात होणाऱ्या थॉमस-उबर करंडक स्पर्धेत खेळणे किती सुरक्षित आहे, असा प्रश्‍न भारतीय बॅडमिंटन स्टार साईना नेहवालने उपस्थित केला आहे. 

नवी दिल्ली: कोरोनाचे संकट भयावह रूप कायम ठेऊन आहे, अशा परिस्थितीत पुढील महिन्यात होणाऱ्या थॉमस-उबर करंडक स्पर्धेत खेळणे किती सुरक्षित आहे, असा प्रश्‍न भारतीय बॅडमिंटन स्टार साईना नेहवालने उपस्थित केला आहे. 

सानियाने ट्विटरच्या माध्यमातून आपली भीती व्यक्त केली. ३ ते ११ ऑक्‍टोबर दरम्यान इंडोनेशियात थॉमस-उबर करंडक स्पर्धा अपेक्षित आहे; परंतु कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नसल्यामुळे सात देशांनी माघार घेतलेली आहे. त्यामुळे आत्ता ही स्पर्धा खेळणे खरोखरीच सुरक्षित आहे का, असे साईना म्हणत आहे.

कोरिया, थायलंड, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, तैवान, सिंगापूर आणि हाँगकाँग या देशांनी थॉमस-उबर करंडक स्पर्धेतून माघार घेतली आहे. चीनही त्याच मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. भारतीय बॅडमिंटन संघटनेने या स्पर्धेस जाण्याची तयारी सुरू केलेली आहे. पी. व्ही. सिंधूने घरगुती कार्यक्रमामुळे स्पर्धेतून माघार घेतली होती; परंतु बॅडमिंटन अध्यक्षांनी तिला खेळण्याची विनंती केली. सिंधूने ती मान्यही केली.

संबंधित बातम्या