
आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सकडून जी कामगिरी अपेक्षित होती, ती कामगिरी संघाला दाखवता आलेली नाही. सलग आठ पराभव पत्करल्यानंतर काल रात्री राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) मुंबईच्या विजयाचे खाते उघडले. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनीही जलवा दाखवला. राजस्थानने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 158 धावा केल्या. (Hrithik Shokin and Kartikeya Singh from Mumbai Indians played important roles in the 2022 IPL match against Rajasthan Royals)
दुसरीकडे, मुंबईच्या गोलंदाजांनी राजस्थानला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. यादरम्यान मुंबईच्या दोन गोलंदाजांनी संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. ऑफ-स्पिनर हृतिक शोकीन आणि कार्तिकेय सिंग (Hrithik Shokin and Kumar Kartikeya) यांनी या सामन्यात आपला जलवा दाखवला. या दोघांकडून मुंबईच्या फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळण्याच्या आशा उंचावल्या आहेत.
दरम्यान, या मोसमात मुंबईकडे आघाडीचे फिरकीपटू नाहीत. राहुल चहर गेल्या मोसमापर्यंत संघासोबत होता, परंतु या हंगामात तो पंजाब किंग्जमध्ये (Punjab Kings) गेला. त्याचवेळी मुंबईला कृणाल पांड्याला सोबत ठेवता आले नाही. आता तो या मोसमात लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघासोबत खेळत आहे. मुंबईला मुरुगन अश्विन आणि मयंक मार्कंडे यांच्याकडून खूप अपेक्षा होती. परंतु या दोघांनाही छाप पाडता आली नाही.
कार्तिकेय पदार्पणातच यशस्वी ठरला
कार्तिकेयने शनिवारी राजस्थानविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत मध्य प्रदेशसाठी आठ सामने खेळले आहेत. कार्तिकेय त्याच्या पहिल्याच आयपीएल सामन्यात दुसऱ्या चेंडूवर विकेट घेण्यात यशस्वी ठरला. त्याने राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनची विकेट घेतली. यानंतर मात्र कार्तिकेयला विकेट घेता आली नाही, परंतु राजस्थानच्या फलंदाजांना रोखण्यात तो यशस्वी ठरला. त्याच्या कोट्यातील चार षटकांत त्याने केवळ 19 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. यादरम्यान कार्तिकेयने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यामुळे मुंबईला दिलासा मिळाला.
तसेच, न्यूझीलंडचा माजी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी कार्तिकेयाबद्दल म्हणाला, 'तो काय गोलंदाजी करत होता हे समजण्यासाठी सात चेंडू लागले. तो डाव्या हाताने गोलंदाजी करतो. लेग स्पिन, सीम बॉलिंग, कॅरम बॉल. फलंदाज त्याचे चेंडू समजून घेत राहिले. फलंदाज तो कधी खराब चेंडू टाकतो त्याची वाट पाहत होते. मिशेल आणि बटलरलाही त्याने चकवा दिला."
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.