Goa T20 Cricket Tournamen: व्हेटरन्स स्पर्धेत गुजरात, हैदराबादची विजयी सलामी

हैदराबादने यजमान गोव्यावर 16 धावांनी केली मात
Goa T20 Cricket
Goa T20 CricketDainik Gomantak

पणजी: चेतन चौहान स्मृती करंडक राष्ट्रीय व्हेटरन्स टी-20 क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने पार पडले असून या दोन सामन्यात हैदराबाद व गुजरातने विजयी सलामी दिली. या स्पर्धेला पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरवात झाली.

(Hyderabad defeated Goa in the National Veterans T20 Cricket Tournament)

हैदराबादने यजमान गोव्यावर 16 धावांनी मात केली. तर हैदराबाद ने अध्यक्षीय संघावर मात केली आहे. गोव्याविरुद्ध हैदराबादच्या विजयात जी. अरविंद कुमार याने मोलाचा वाटा उचलला. तोच सामनावीर ठरला. सलामीच्या फलंदाजाने 63 चेंडूंत 15 चौकार व 1 षटकार यांच्या मदतीने 89 धावा केल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 3 बाद 154 धावा केल्या. उत्तरादाखल गोव्याला 9 बाद 138 धावांचीच मजल मारता आली. गोव्यातर्फे चंद्रकांत घाडी याने किल्ला लढविताना 41 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकार यासह 42 धावा केल्या.

स्पर्धेचे उद्‍घाटन मच्छिमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या हस्ते झाले. यावेळी गोवा व्हेटरन्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद फडके, आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पाटणेकर, भारतीय व्हेटरन्स क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण त्यागी, संयुक्त सचिव सुधीर कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

गुजरातची बाजी

पश्चिम विभागीय विजेत्या गुजरातने नीलेश रे (51) व विमल तांडेल (53) यांच्या अर्धशतकांच्या बळावर 8 बाद 166 धावा केल्या. तळातील समीर पाटील याने केलेल्या फटकेबाजीमुळे अध्यक्षीय संघाला मुसंडी मारता आली, पण त्यांचे प्रयत्न आठ धावांनी कमी पडले. समीरने 23 चेंडूंत 46 धावा करताना 3 चौकार व 3 षटकार मारले. 22 धावांत 3 गडी बाद करणारा गुजरातचा कर्णधार विश्वजितसिंग सोळंकी सामन्याचा मानकरी ठरला.

Goa T20 Cricket
T20 World Cup मधील पराभवानंतर BCCI ची मोठी कारवाई, सर्व सेलेक्टर्सची हकालपट्टी

संक्षिप्त धावफलक

हैदराबाद : 20 षटकांत 3 बाद 154 (जी. अरविंद कुमार 89, चंद्रशेखर थोटा 33, मुक्तियार कादरी 4-0-42-0, राजेंद्र दाभोळकर 4-0-14-0, संदीप दाभोळकर 4-0-24-2, विनोद विल्सन 2-0-25-0, धीरज नार्वेकर 4-0-25-0, अभिजित तळेकर 2-0-1७-0) वि. वि. गोवा : 20 षटकांत 9 बाद 138 (दामोदर रेडकर 8, अवधूत आमोणकर 4, धीरज नार्वेकर 10, चंद्रकांत घाडी 42, संदीप दलाल 29, मुक्तियार कादरी 5, विनोद विल्सन 1, राजेंद्र दाभोळकर 12, संदीप दाभोळकर नाबाद 1७, अभिजित तळेकर 0, सिद्धेश वेरेकर नाबाद 1, डॉ. गिरी 2-19, टी. पवन कुमार 1-19, चेतन जोशी 3-30, मल्लिकार्जुन जांगिती 1-2७, चंद्रशेखर थोटा 1-31).

Goa T20 Cricket
FIFA World Cup: अर्जेंटिनाला मोठा धक्का, हे दोन स्टार खेळाडू फिफा वर्ल्ड कपमधून आऊट

गुजरात व्हेटरन्स : 20 षटकांत 8 बाद 166 (नीलेश रे 51, यशपालसिंग गोहिल 36, विमल तांडेल 53, संतोष शिंदे 3-36, कादीर पटेल 3-32, समीर शाह 1-30) वि. वि. अध्यक्षीय संघ : 20 षटकांत 8 बाद 159 (दिलीप अगरवाल 13, तुषार झव्हेरी 30, कादीर पटेल 22, संतोष शिंदे 16, प्रवीण तांबे 12, समीर पाटील 46, एन. के. अशोक नाबाद 13, मिनेश पटेल 2-34, विश्वजितसिंग सोळंकी 3-22, केतन अहिर 3-29).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com