चार गुणांसह सातव्या स्थानावर हैदराबाद संघ; आज बंगलोरशी भिडणार

मॅनोलो मार्केझ-प्रशिक्षित हैदराबाद संघ तीन सामन्यांतून चार गुणांसह सातव्या स्थानावर
Hyderabad fc
Hyderabad fcDainik gomantak

हैदराबाद (Hyderabad FC) एफसी बुधवारी गोव्यातील बांबोलीम येथील अॅथलेटिक स्टेडियमवर हिरो इंडियन सुपर लीग (ISL) सामन्यात बेंगळुरू एफसीशी (Bengaluru FC) भिडणार आहेत. सीझनच्या निराशाजनक सुरुवातीनंतर, हैदराबाद FC ने शेवटच्या गेममध्ये जमशेदपूर FC च्या विरुद्ध एक कठीण पॉइंट मिळवण्यापूर्वी पुढील गेममध्ये मुंबई सिटी FC वर 3-1 असा प्रेरणादायी विजय मिळवला आहे. दुसरीकडे, बेंगळुरू FC ने नॉर्थईस्ट युनायटेड FC वर 4-2 असा विजय मिळवल्यानंतर, ओडिशा FC आणि मुंबई सिटी FC विरुद्ध 1-3 असा पराभव पत्करावा लागला आणि केरळ ब्लास्टर्स FC बरोबर ड्रॉ झाला.

मॅनोलो मार्केझ-प्रशिक्षित हैदराबाद संघ तीन सामन्यांतून चार गुणांसह सातव्या स्थानावर आहे. दरम्यान, बेंगळुरू एफसी सुरुवातीच्या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसीवर विजय मिळवल्यानंतर त्यांना एकही गेम जिंकता आलेला नाही. फॉर्म पाहता त्यांना हैदराबाद एफसीचे कडवे आव्हान आहे.

Hyderabad fc
संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत गोव्याची विजयी सलामी

दरम्यान, ब्लूजला त्यांच्या शेवटच्या गेममध्ये टेबल-टॉपर्स मुंबई सिटी एफसीकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला आणि चार सामन्यांमधून त्यांना फक्त एक विजय मिळाला आहे. परंतु प्रशिक्षक मार्को पेझ्झाइउओली यांनी सामान्यानंतर सांगितले की, पहिल्या दहा मिनिटांत गोल झाल्यानंतर क्लीटन सिल्वाद्वारने संघाने प्रतिसाद दिला.

दोन्ही संघांनी दुसर्‍या सामन्यात मुंबईला पराभूत करून आवाहन दिले आहे. नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचा 4-2 असा पराभव केल्यानंतर बंगळुरूने विजयी सुरुवात केली, परंतु त्यानंतर सातत्य राखणे कठीण झाले.

Hyderabad fc
महिला फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी स्टेसी

या लीगमध्ये सर्व संघ मजबूत आहेत. त्यामुळे निकालात चढ-उतार झाले आहेत. अंतिम स्थिती केवळ शेवटच्या टप्प्यातच ठरवली जाईल. हलीचरण नरझारी आणि मोहम्मद यासिर बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यासाठी बाहेर असणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com