हैदराबाद एफसीने गोलरक्षक कट्टीमनीसच्या करारात केली वाढ

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

अनुभवी गोमंतकीय गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी याचा करार हैदराबाद एफसीने आणखी एका वर्षासाठी वाढविला आहे.

पणजी : अनुभवी गोमंतकीय गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनी (Lakshmikant Kattimani) याचा करार हैदराबाद एफसीने (Hyderabad FC) आणखी एका वर्षासाठी वाढविला आहे. तो या संघात आता 2021-22 मोसमाअखेरपर्यंत असेल. ``मी या क्लबतर्फे दोन वर्षे व्यतित केली आहेत आणि याठिकाणी मी अतिशय आनंदित आहे. या क्लबला आणि संबंधित लोकांना मी चांगल्याप्रकारे ओळखतो, त्यामुळेच हैदराबाद एफसीसोबत करार वाढविण्याचा निर्णय घेणे मला सोपे ठरले,`` असे लक्ष्मीकांतने सांगितले. (Hyderabad FC has increased the contract of goalkeeper Kattimanis)

लक्ष्मीकांत कट्टीमनी 31 वर्षांचा आहे. हैदराबाद एफसीची निर्मिती झाल्यापासून तो या संघात आहे. नुकत्याच संपलेल्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तो प्रशिक्षक मानोलो मार्किझ यांचा पहिल्या पसंतीचा गोलरक्षक होता. ``तो एक चांगला गोलरक्षक आहे. तो केवळ फटके रोखण्यात वाकबगार नसून पदलालित्यातही तरबेज आहे. त्याचा आत्मविश्वासाने भारलेला खेळ आमच्या नियोजनात चपखलपणे बसतो,`` असे मार्किझ यांनी कट्टीमनीविषयी सांगितले.

AFC Champions League: एफसी गोवास आणखी एक संधी; परतीच्या लढतीत पर्सेपोलिस एफसीचे...

लक्ष्मीकांत कट्टीमनी आतापर्यंत आयएसएल स्पर्धेत एकूण 59 सामने खेळला आहे. गतमोसमात हैदराबाद एफसीला पाचवा क्रमांक मिळाला, त्यात लक्ष्मीकांतचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. त्यामुळे प्रशिक्षक मानोलो यांनी त्याच्यावर विश्वास दाखविला आहे. 2020-21 मोसमातील आयएसएल स्पर्धेत कट्टीमनीने 14 सामन्यांत हैदराबादचे प्रतिनिधित्व केले. त्यात सहा सामन्यांत त्याने एकही गोल स्वीकारला नाही.

संबंधित बातम्या