गोमंतकीय लिस्टनच्या गुणवत्तेस हैदराबादने सावरले.

dainik gomantak
सोमवार, 11 मे 2020

लिस्टनला एफसी गोवा संघ व्यवस्थापनाने ऑक्टोबर २०१७ मध्ये करारबद्ध केले. त्यापूर्वीत्याने साळगावकर एफसीच्या ज्युनियर आणि सीनियर संघातून खेळताना खूपच उल्लेखनीय खेळ केला होता. २०१६-१७ मोसमातील गोवा प्रो-लीग स्पर्धेत साळगावकर एफसीचे प्रतिनिधित्व करताना लिस्टनने सर्वाधिक गोल केले होते.

पणजी,

 गोव्याचा २१ वर्षीय युवा स्ट्रायकर लिस्टन कुलासो याला इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत एफसी गोवा संघातर्फे करारबद्ध असताना क्वचितच संधी मिळालीमात्र या वर्षी जानेवारीत हैदराबाद एफसी संघात दाखल झाल्यानंतर त्याच्या गुणवत्तेस न्याय मिळालात्याची कारकीर्द सावरली.

लिस्टनला एफसी गोवा संघ व्यवस्थापनाने ऑक्टोबर २०१७ मध्ये करारबद्ध केले. त्यापूर्वीत्याने साळगावकर एफसीच्या ज्युनियर आणि सीनियर संघातून खेळताना खूपच उल्लेखनीय खेळ केला होता. २०१६-१७ मोसमातील गोवा प्रो-लीग स्पर्धेत साळगावकर एफसीचे प्रतिनिधित्व करताना लिस्टनने सर्वाधिक गोल केले होते. या कामगिरीने त्याने एफसी गोवा संघाला प्रभावित केले. मात्र तो त्या संघाचे माजी प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांची मर्जी संपादन करू शकला नाही. त्याला एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघातूनच जास्त खेळावे लागले. २०१७-१८ मोसमापासून हा सेंटर-फॉरवर्ड खेळाडू एफसी गोवाच्या मुख्य संघातून फक्त आठ सामनेच खेळू शकला.

दवर्लीच्या लिस्टनने यंदाच्या मोसमात राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांचेही लक्ष वेधलेत्यामुळे त्याला भारताच्या संभाव्य संघाच्या सराव शिबिरात स्थान मिळाले होते. मात्र कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संघाचे शिबिर रद्द करण्यात आले.

 

नवी संधी साधली

आयएसएल स्पर्धेत वारंवार एफसी गोवा संघाच्या बेंचवर बसल्याने कंटाळलेल्या लिस्टनसाठी नवी संधी चालून आली. हैदराबाद एफसीशी करार करण्यासाठी एफसी गोवा संघाने त्याला मंजुरी दिली. १४ जानेवारीस लिस्टनने हैदराबाद एफसीच्या दोन वर्षे कालावधीच्या करारपत्रावर सही केली. त्याचा करार ३१ मे २०२२ रोजी संपेल. हैदराबाद संघाचे प्रशिक्षक आल्बर्ट रोका यांना लिस्टनच्या सफाईदार शैलीने आकर्षित केले. तो हैदराबादकडून आयएसएल स्पर्धेत २२७ मिनिटे खेळला व दोन गोलही नोंदविले. त्यापूर्वी अडीच मोसमाच्या कालावधीत त्याला एफसी गोवाकडून फक्त ५१ मिनिटेच खेळायला मिळाली होती.

 

`आयएसएल`मध्ये गोल

हैदराबाद एफसी व नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यात २० फेब्रुवारी रोजी गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात लिस्टनने १२व्या मिनिटास गोल केला. आयएसएल कारकिर्दीतील त्याचा हा पहिलाच गोल ठरला. त्याच सामन्यात लिस्टनने ४१व्या मिनिटास आणखी एक गोल नोंदविला. तोच सामन्याचा मानकरी ठरला. हैदराबाद एफसीने विजयासह मोसमाची समाप्ती केलीपण ते १० गुणांसह तळाच्या स्थानी राहिले. मोसमाच्या अखेरीस बजावलेल्या कामगिरीमुळे लिस्टनला मात्र नवा आत्मविश्वास गवसला.

संबंधित बातम्या