तुला मानला रे ठाकूर!" शार्दुलचं विराटने मराठमोळ्या अंदाजात केलं कौतुक

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 17 जानेवारी 2021

कर्णधार  विराट  कोहलीने  सुंदर  आणि  शार्दुल  यांच्या  खेळीचं  कौतुक  केलं."स्वता:च्या खेळीवर  विश्वास  ठेवत  तुम्ही  दोघांनी  भारतासाठी  सामना  पुन्हा  नव्याने  जिवंत केला. वॉशिंग्टन  तू  पदार्पणाच्या  सामन्यात  दमदार  कमाल  केली  आणि  तुला  मानला  ठाकूर!" म्हणत   विराटने  मराठमोळ्या  अंदजात  कौतुक  केलं.

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाने  पहिल्या  डावात  सुरुवात  करत  भारतासमोर  369  धावांचं आव्हान  उभं  केलं.  मात्र  या  आव्हानाला  प्रत्युत्तर  देताना  भारताची  फलंदाजी  काही प्रमाणात  डगमगली. परंतु  संघावरील  दबाव  कमी  करण्यासाठी  वॉशिंग्टन  सुंदर  आणि शार्दुल  ठाकूर  या  दोघांनी  भारताचा  डाव  सावरत  शतकी  खेळी  केली.

शार्दुलने  उत्तम  फलंदाजी  करत  सर्वाधिक  67  धावांची  खेळी  केली  आणि  कसोटी कारकिर्दीतील  पहिले  अर्धशतक  ठोकले. 115  चेंडूत  त्याने  9  चौकारांसह  2  षटकार लगावत  अर्धशतकी  खेळी  केली. तसेच  सुंदरने  144  चेंडूत  62  धावा  करत  डाव सावरला.

कर्णधार  विराट  कोहलीने  सुंदर  आणि  शार्दुल  यांच्या  खेळीचं  कौतुक  केलं."स्वता:च्या खेळीवर  विश्वास  ठेवत  तुम्ही  दोघांनी  भारतासाठी  सामना  पुन्हा  नव्याने  जिवंत केला. वॉशिंग्टन  तू  पदार्पणाच्या  सामन्यात  दमदार  कमाल  केली  आणि  तुला  मानला  ठाकूर!" म्हणत   विराटने  मराठमोळ्या  अंदजात  कौतुक  केलं.

संबंधित बातम्या