I-League 2 : एफसी गोवा, धेंपो क्लबची मोहीम आजपासून

डेव्हलपमेंट संघात गोमंतकीय खेळाडूंना प्राधान्य
FC Goa team player
FC Goa team playerDainik Gomantak

द्वितीय विभाग आय-लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा व धेंपो स्पोर्टस क्लब या गोमंतकीय संघांची मोहीम बुधवारपासून (ता. 15) सुरू होईल. त्यांच्यातील पहिला सामना एला-जुने गोवे येथील धेंपो अकादमी मैदानावर खेळला जाईल.

एफसी गोवाने डेव्हलपमेंट संघात गोमंतकीय खेळाडूंना प्राधान्य दिले असून 29 पैकी 25 खेळाडू राज्यातील आहेत. ह्रतीक तिवारी, लेस्ली रिबेलो व एचपी लालरेमरुआता हे तिघे मुख्य संघातील आहेत.

FC Goa team player
Mopa International Airport: आणि मनोहर विमानतळावर कोंकणीत झळकला बोर्ड, सरदेसाई म्हणतात अभिमान वाटतो...

एफसी गोवाच्या 17 वर्षांखालील संघातील प्रचित गावकर व साईश गावकर यांना डेव्हलपमेंट संघात बढती मिळाली आहे. डेगी कार्दोझ संघाचे मुख्य प्रशिक्षक, तर सुगितेश मांद्रेकर सहाय्यक प्रशिक्षक आहेत.

डेव्हलपमेंट संघातील खेळाडूंना व्यापक स्पर्धात्मक संधी मिळावी हा द्वितीय विभाग आय-लीग स्पर्धेत खेळण्याचा मुख्य उद्देश असल्याचे कार्दोझ यांनी सांगितले.

ड गटात एफसी गोवा व धेंपो क्लबसह अंबरनाथचा युनायटेड अटलांटा एफसी, अहमदाबादचा एआरए एफसी व हैदराबाद एफसी हे अन्य संघ आहेत.

FC Goa team player
Chess Tournament : जर्मनीतील बुद्धिबळ स्पर्धेत गोमंतकीय ग्रँडमास्टर लिऑन विजेता

एफसी गोवा संघ

गोलरक्षक : हॅन्सेल कुएल्हो, बॉब जॅकसन, ह्रतीक तिवारी, बचावपटू ः दिशांक कुंकळीकर, व्हर्स्ली पेस, लीवन कास्तान्हा, रायन रॉजर मिनेझिस, रीझव्हन फर्नांडिस, सलमान फारिस, डेल्झन पासान्हा, मनुशॉन फर्नांडिस, आदित्य साळगावकर, मलिकजान कालेगार, लेस्ली रिबेलो,

मध्यरक्षक : व्हेलिंग्टन फर्नांडिस, शेनॉन व्हिएगस, रायन मिनेझिस, अँथनी फर्नांडिस, माल्सॉमत्लुआंगा, प्रचित गावकर, एचपी लालरेमरुआता,

आघाडीपटू : व्हेलरॉय फर्नांडिस, जोव्हियल डायस, सेल्जिओ डायस, मेव्हन डायस, डेल्टन कुलासो, वसीम इनामदार, जॉर्डन बोर्जिस, साईश गावकर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com