I-League 2021 : चर्चिल ब्रदर्सची ऐजॉलशी बरोबरी

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला बुधवारी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत ऐजॉल एफसीविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले.

पणजी :  माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला बुधवारी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत ऐजॉल एफसीविरुद्ध गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले. सामना पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील म्युनिसिपल स्टेडियमवर झाला.बरोबरीमुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणाचा लाभ झाला. चर्चिल ब्रदर्सची ही सहा लढतीतील तिसरी बरोबरी ठरली.

ISL:नॉर्थईस्टचा धडाका गोवा रोखणार? गुवाहाटीच्या संघाचे सलग तीन विजय

अपराजित असलेल्या या संघाने अन्य तीन लढतीत विजय नोंदविला आहे. सर्वाधिक 12 गुणांसह त्यांनी अग्रस्थान टिकवले. दुसऱ्या क्रमांकावरील सुदेवा दिल्ली एफसी व ऐजॉल एफसीचे प्रत्येकी आठ गुण आहेत.चर्चिल ब्रदर्ससाठी पाच गोल नोंदविणारा होंडुरासचा स्ट्रायकर क्लेव्हिन झुनिगा दुखापतीमुळे ऐजॉलविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. त्याची अनुपस्थिती गोव्यातील संघाला जाणवली. दोन्ही संघांनी गोल करण्याच्या संधी दवडल्या.

ISL : तब्बल आठ लढतीनंतर बंगळूरचा विजयासाठी वनवास संपुष्टात

व्हारेला सर्वोत्तम प्रशिक्षक

सामन्यापूर्वी चर्चिल ब्रदर्सचे प्रशिक्षक फर्नांडो व्हारेला यांना आय-लीग स्पर्धेत जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम प्रशिक्षकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

संबंधित बातम्या