I League: चर्चिल ब्रदर्सचे संभाव्य जेतेपद धोक्यात; ट्राऊ संघाविरुद्ध गुण गमावल्यास आय-लीग करंडक निसटणार
I League Churchill Brothers potential title in jeopardy If I lose points against Troy I League trophy will be lost

I League: चर्चिल ब्रदर्सचे संभाव्य जेतेपद धोक्यात; ट्राऊ संघाविरुद्ध गुण गमावल्यास आय-लीग करंडक निसटणार

पणजी: (I League Churchill Brothers potential title in jeopardy If I lose points against Troy I League trophy will be lost) आय-लीग फुटबॉल स्पर्धेत सलग अकरा अपराजित लढतीसह अव्वल स्थान राखलेल्या चर्चिल ब्रदर्सला मागील दोन सामन्यांत हार पत्करावी लागली, त्यामुळे गोव्यातील संघावर दबाव आहे. मणिपूरच्या टिड्डिम रोड अॅथलेटिक युनियन (ट्राऊ) संघाविरुद्ध पूर्ण तीन गुण गमावल्यास विजेतेपदाचा करंडक त्यांच्या हातून निसटू शकतो. 

ट्राऊ आणि चर्चिल ब्रदर्स यांच्यातील सामना रविवारी  कोलकात्यातील किशोर भारती क्रीडांगणावर खेळला जाईल. सलग पाच सामने जिंकलेला ट्राऊ संघ विजेतेपदाचा प्रमुख दावेदार आहे. त्यांचे आणि चर्चिल ब्रदर्सचे 13 लढतीनंतर समान 25 गुण आहेत. रविवारी विजय मिळविणारा संघ आय-लीग विजेतेपदाचा करंडक जवळपास निश्चित करेल. साहजिकच दोन्ही संघांसाठी सामना अतिशय महत्त्वाचा आहे. चर्चिल ब्रदर्स पराजित झाल्यास त्यांच्या विजेतेपदाचा आशांना तडा जाईल आणि ट्राऊ संघ मुसंडी मारेल. विजेतेपद मणिपूरी संघाच्या आवाक्यात येईल. गोकुळम केरळाच्या 23 गुण असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. (I League Churchill Brothers potential title in jeopardy If I lose points against Troy I League trophy will be lost)

स्पॅनिश फर्नांडो व्हारेला यांच्या मार्गदर्शनाखालील संघ सलग 11 सामने जोमाने खेळला, पण मागील दोन लढतीत अनुक्रमे गोकुळम केरळा व महम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध पराभव पत्करताना तब्बल सात गोल स्वीकारले, यावरून चर्चिल ब्रदर्स संघाचा बचाव कमजोर झाल्याचे जाणवते. ट्राऊ संघाने स्पर्धेत सात विजय नोंदविले आहेत, त्यापैकी पाच सलग आहे, शिवाय नंदकुमार यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने 25 गोलही केले आहेत. ट्राऊ संघाने मागील तीन लढतीत अनुक्रमे महम्मेडन स्पोर्टिंग, रियल काश्मीर व पंजाब एफसीवर विजय नोंदविताना एकत्रित आठ गोल नोंदविले आहेत. त्यामुळे रविवारी चर्चिल ब्रदर्सच्या बचावफळीवर जास्त दबाव असेल. ट्राऊ संघाचा युवा आघाडीपटू बिद्याशागर सिंग जोरदार फॉर्ममध्ये असून त्याने दोन हॅटट्रिकसह स्पर्धेत सर्वाधिक 11 गोल नोंदविले आहेत.

``आम्हाला एकाग्रता वाढवावी लागेल आणि चुका दुरुस्त करण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. पूर्वीप्रमाणेच आम्हाला विजेतेपदाची संधी आहे, आम्हाला दृढनिश्चयासह क्षमतेवर आणि स्वतःवर विश्वास राखणे गरजेचे आहे,``  असे चर्चिल ब्रदर्सचे प्रशिक्षक फर्नांडो व्हारेला यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले. आपला संघ रविवारच्या लढतीत शेवटच्या सेकंदपर्यंत लढणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.

``आम्ही करंडक जिंकण्याच्या स्थितीत असू असा विचार अजिबात केला नव्हता, आम्ही पदावनती टाळण्याचा विचार करत होतो आणि नंतर पहिल्या संघात स्थान मिळविण्याचे लक्ष्य राखले. सध्या आम्ही ज्या स्थितीत आहोत त्यास मेहनत आणि दृढनिश्चय कारणीभूत आहे,`` असे ट्राऊ संघाचे प्रशिक्षक नंदकुमार यांनी सांगितले. ``प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आम्ही विजेते ठरू याबाबत विचारच केला नव्हता. प्रत्येकवेळी आम्ही फक्त एका सामन्याचेच नियोजन केले आणि उद्याचा सामनाही तसाच असेल. चर्चिल ब्रदर्सला नमविण्यासाठीच आम्ही खेळणार आहोत,`` असे त्यांनी आत्मविश्वासाने नमूद केले.

दृष्टिक्षेपात...

- टिड्डिम रोड अॅथलेटिक युनियनचे (ट्राऊ) 13 लढतीत 7 विजय, 4 बरोबरी, 2 पराभव, 25 गुण, गोलसरासरी +11

- चर्चिल ब्रदर्सचे 13 सामन्यांत 7 विजय, 4 बरोबरी, 2 पराभव, 25 गुण, गोलसरासरी +4

- ट्राऊ संघाचे 25, तर चर्चिल ब्रदर्सचे 18 गोल

- यंदा पहिल्या टप्प्यात चर्चिल ब्रदर्स व ट्राऊ यांच्यातील सामना 1-1 गोलबरोबरीत

- ट्राऊ संघाच्या बिद्याशागर सिंगचे 11, तर चर्चिल ब्रदर्सच्या लुका मॅसेन याचे 9 गोल

- गतमोसमातील 2 लढतीत ट्राऊ संघाची चर्चिल ब्रदर्सवर मात
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com