आय-लीग : चर्चिल ब्रदर्स खडतर आव्हानासाठी सज्ज

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

ऐजॉल एफसीचे आव्हान खडतर असले, तरी आपला संघ सज्ज असल्याचा विश्वास चर्चिल ब्रदर्सचे प्रशिक्षक फर्नांडो व्हारेला यांनी व्यक्त केला आहे. आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अग्रस्थानावरील आघाडी कायम राखण्याची त्यांनी संधी आहे. सध्या ते प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चार गुणांनी पुढे आहेत.

पणजी : ऐजॉल एफसीचे आव्हान खडतर असले, तरी आपला संघ सज्ज असल्याचा विश्वास चर्चिल ब्रदर्सचे प्रशिक्षक फर्नांडो व्हारेला यांनी व्यक्त केला आहे. आय-लीग फुटबॉल स्पर्धेत अग्रस्थानावरील आघाडी कायम राखण्याची त्यांनी संधी आहे. सध्या ते प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चार गुणांनी पुढे आहेत.

INDvsENG: क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर; दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी 50 टक्के...

चर्चिल ब्रदर्स व ऐजॉल एफसी यांच्यातील आय-लीग फुटबॉल सामना बुधवारी (ता. 3) पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील म्युनिसिपल स्टेडियमवर खेळला जाईल. चर्चिल ब्रदर्स संघ सलग पाच लढती अपराजित आहे. तीन विजय व दोन बरोबरीसह त्यांचे सर्वाधिक 11 गुण आहेत. ऐजॉल एफसीने चार लढतीतून दोन विजय, प्रत्येकी एक बरोबरी व पराभवासह सात गुण प्राप्त केले असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यॅन लॉ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ धोकादायक गणला जातो. त्यांच्यासाठी चर्चिल ब्रदर्सविरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे.

ऐजॉल एफसीविरुद्धचा सामना कठीण असेल. त्यांच्यापाशी चांगले गुणवान खेळाडू आहेत. सेटपिसेवरही ते प्रभावी ठरतात. ते आम्हाला निश्चितच कडवी लढत देतील. तथापि, आमची खेळण्याची शैली निश्चित आहे आणि आम्ही त्यांच्या आव्हानासाठी सज्ज आहोत. आम्हाला संधी निर्माण करत राहावे लागेल आणि स्पर्धेतील शानदार फॉर्म कायम राखावा लागेल, असे व्हारेला यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला सांगितले. ट्राऊ एफसीविरुद्धच्या मागील लढतीत प्रमुख खेळाडू क्लेटन झुनिगासह तिघे खेळाडू जायबंदी झाल्यामुळे चर्चिल ब्रदर्सला फटका बसला होता, तरीही त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले होते.

दृष्टिक्षेपात...

- आय-लीग स्पर्धेत एकमेकांविरुद्धच्या मागील 5 लढतीत चर्चिल ब्रदर्सचे 3, तर ऐजॉलचा 1 विजय, 1 सामना बरोबरी

- चर्चिल ब्रदर्सच्या क्लेटन झुनिगाचे सर्वाधिक 5 गोल

- यंदा चर्चिल ब्रदर्सचे 9, तर ऐजॉल एफसीचे 5 गोल

- ऐजॉल एफसीची मागील लढतीत नेरोका एफसीवर 2-1 फरकाने विजय

- चर्चिल ब्रदर्सची अगोदरच्या लढतीत ट्राऊ एफसीशी 1-1 गोलबरोबरी

 

 

संबंधित बातम्या