Virat Kohli: 'तो केवळ धोनीच होता...', माहीचा राईट-हँड विराटने सांगितले कसा मिळाला MS Dhoni कडून सपोर्ट

एमएस धोनीबरोबरील नात्याबद्दल भाष्य करताना विराट कोहलीने अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला आहे.
Virat Kohli | MS Dhoni
Virat Kohli | MS DhoniDainik Gomantak

Virat Kohli opens up on relationship with MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने जागतिक क्रिकेटमध्ये एक फलंदाज म्हणून वेगळी ओळख मिळवली आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक संघसहकाऱ्यांबरोबर क्रिकेट खेळले. यामध्ये कॅप्टनकूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एमएस धोनीचाही समावेश आहे.

दरम्यान, धोनीबरोबरील त्याची मैत्री खास असल्याचे त्याने अनेकदा सांगितले आहे. आता पुन्हा एकदा त्याने धोनीबरोबरी नात्याबद्दल मोठे भाष्य केले आहे. विराटने आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये धोनीने त्याला त्याच्या वाईट काळात कशी साथ दिली याबद्दल सांगितले आहे.

त्याने सांगितले की 'त्या काळात अनुष्का माझ्यासाठी सर्वात मोठा पाठिंबा होती. ती प्रत्येकवेळी माझ्याबरोबर होती आणि तिने मला जवळून पाहिले होते की मी कशातून जात आहे आणि गोष्टी कशा घडत आहेत. याशिवाय माझ्या लहानपणीचे प्रशिक्षक आणि माझ्या कुटुंबाशिवाय फक्त एक व्यक्ती होता, ज्याने या काळात माझ्याशी संपर्क साधला, तो व्यक्ती म्हणजे एमएस धोनी.'

Virat Kohli | MS Dhoni
Virat Kohli आता अलिबागमध्येही राहणार! खरेदी केलाय कोट्यवधींचा आलिशान बंगला, पाहा Video

'त्याने माझ्याशी संपर्क साधला होता. तुम्हाला त्याच्याशी खूप क्वचित संपर्क करता येतो. जर मी त्याला एखाद्या साधारण दिवशी फोन केला, जर 99 टक्के तो कॉल उचलणार नाही, कारण तो फोनकडे फार पाहात नाही. त्यामुळे तो मला संपर्क करतो. असे आत्तापर्यंत दोनवेळा झाले आहे.'

'एकदा त्याने मला मेसेज केला होता की जेव्हा तुम्ही मजबूत असाल अशी सर्वांना अपेक्षा असते आणि दिसताना पण तुम्ही मजबूत दिसता, तेव्हा लोक तुम्हाला तुम्ही कसे आहात, हे विचारायला विसरतात.'

'त्यामुळे हे धोनीचे शब्द होते, जे मला घरच्यासारखे वाटले. कारण मी नेहमीच विश्वासाने भरलेला, मानसिकरित्या मजबूत आणि कोणत्याही परिस्थितीत मार्ग शोधून देणारा दिसलो आहे. पण कधीकधी तुम्हाला जाणवते की एक माणूस म्हणून तुम्हालाही कधीतरी दोन पावले मागे यावे लागते. तुम्ही काय करत आहात, हे समजून घ्यावे लागते. तुमचे आरोग्य कसे आहे, हे तपासावे लागते.'

विराटने यापूर्वीही सांगितले होते की जेव्हा त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी कर्णधारपद सोडले होते, तेव्हा धोनीने त्याला मेसेज केला होता.

Virat Kohli | MS Dhoni
Team India वर बसतोय 'चोकर्स'चा शिक्का! गेल्या दहा वर्षातील तब्बल 15 ICC स्पर्धाच आहेत पुरावा

दरम्यान, विराट आणि धोनी जवळपास 11 वर्षे भारतीय संघाकडून एकत्र खेळले आहेत. महत्त्वाचे म्हणजे जेव्हा धोनीने 2014 च्या अखेरीस कसोटी कर्णधारपद आणि 2017 सालच्या सुरुवातीला मर्यादीत षटकांमधील भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले, तेव्हा विराट कोहलीकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आली होती.

पण या नेतृत्वबदलामुळे त्यांच्या नात्यात काही फरक पडला नसल्याचेही विराटने सांगितले. विराट म्हणाला, 'धोनी आणि माझ्यामध्ये कधीही असहजता नव्हती. कारण त्याने मला निवडले होते. त्याने मला 2012 पासूनच शिकवायला सुरुवात केली होती. मी त्याचा उपकर्णधार होतो.'

'मैदानावर आपण काय करू शकतो याबद्दल आम्ही नेहमी चर्चा करायचो. मी नेहमीच त्याचा उजवा हात राहिलो. मी नेहमीच खेळ समजून घेण्याचा प्रयत्न करायचो. मी तेव्हा सातत्याने संघासाठी मॅच विनिंग खेळी करत होतो, त्यामुळे माझा आत्मविश्वासही वाढलेला होता.'

'मी त्याला मैदानात माझीही मतं सांगायचो. मी असा खेळाडू नव्हतो, जो मैदानावर केवळ क्षेत्ररक्षण करेल. मी कधीही स्कोअरबोर्ड पाहयचो नाही की किती धावा हव्या आहेत, किती धावा झाल्या आहेत. मी नेहमी खेळपट्टी, परिस्थिती कशी आहे, एखादी भागीदारी तोडण्यासाठी काय करावे लागेल, याचा विचार करायचो. धोनीला याबद्दल खूप लवकर कळाले होते, त्यामुळे त्याने मला त्याच्या पंखाखाली खूप आधीच घेतले होते. त्यामुळे नेतृत्व बदल खूप सहज झाला.'

Virat Kohli | MS Dhoni
MS Dhoni: धोनी...धोनी...! 'लोकल बॉय'ची झलक पाहून चाहते दंग; कॅप्टनकूलकडूनही मिळाला प्रतिसाद; Video

विराट म्हणाला, 'मी त्याचा खूप सन्मान करतो. त्याने ज्याप्रकारे संघाचे नेतृत्व केले आणि कामगिरी केली, ते शानदार होते. मी त्याच्याबद्दल कधीही वाईट विचार करू शकत नाही. माझ्या मनात हा विचार कधीच नाही आला, की मला त्याची जागा घ्यायची आहे. मला छान वाटते की तो माझ्यावर विश्वास ठेवतो आणि मी त्याच्याबरोबर कधीही बोलू शकतो.'

विराटने त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण देखील धोनीच्या नेतृत्वाखाली केले होते. तसेच तो धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवलेल्या 2011 वर्ल्डकपमधील आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारतीय संघाचा भाग होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com