कर्णधारपदाच्या भाराबाबत प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यावर उत्तर देईन: रवी शास्त्री
टीम इंडियामध्ये दोन वेगळे कर्णधार असावेत की नाही याचे उत्तर फक्त क्रिकेटचे तज्ञच देऊ शकतील.Da

कर्णधारपदाच्या भाराबाबत प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यावर उत्तर देईन: रवी शास्त्री

सध्या भारतीय कर्णधार (Captain) विराट कोहली (Virat Kohli) असून, कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आहे. तर एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे.

नवी दिल्ली: टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Captain Virat Kohli) कर्णधार पदाचा भार उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बरोबर वाटून घ्यावा का? भारतीय क्रिकेटच्या दोन सर्वोत्तम फलंदाजांमध्ये वाद आहे का? या सर्व बाबींवर भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Coach Ravi Shastri) यांनी बुधवारी भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील चौथ्या कसोटीच्या आधी आपले मत मांडले आहे.

टीम इंडियामध्ये दोन वेगळे कर्णधार असावेत की नाही याचे उत्तर फक्त क्रिकेटचे तज्ञच देऊ शकतील.
END vs IND: चौथ्या कसोटीला आजपासून सुरुवात, असे असेल ओव्हलमध्ये हवामान

क्रिकेटमधील कर्णधार पदाच्या विभाजनाबद्दल बोलताना प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले, क्रिकेटच्या तीनही प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरीचे श्रेय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांना जाते. टीम इंडियामध्ये दोन वेगळे कर्णधार असावेत की नाही याचे उत्तर फक्त क्रिकेटचे तज्ञच देऊ शकतील.

टीम इंडियामध्ये दोन वेगळे कर्णधार असावेत की नाही याचे उत्तर फक्त क्रिकेटचे तज्ञच देऊ शकतील.
IND vs ENG: जेम्स अँडरसन कसोटी मालिकेनंतर घेणार निवृत्ती?

ते म्हणाले , मी सध्या संघाचा प्रशिक्षक आहे. निवडकर्ता किंवा ब्रॉडकास्टर नाही. नोव्हेंबर मध्ये माझा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपणार आहे. यानंतर मला विचारले तर मी याचे उत्तर देईल. आताच्या क्षणी मला संघावर आणि संघात कोण आहे यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. सध्याच्या भारतीय संघाने कोहली, रोहित आणि रहाणेसारख्या अनुभवी खेळाडूंच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली आहे.

सध्या भारतीय कर्णधार विराट कोहली असून, कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आहे. तर एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आहे. ते सध्या चांगली कामगिरी करत आहेत. मागिल 5 वर्षांमध्ये भारतीय संघाने सातत्याने चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे मी आनंदी आहे असेही नमूद केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com