दशक टी -20 संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी: आयसीसीने केले जाहीर

दैनिक गोमन्तक
रविवार, 27 डिसेंबर 2020

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयसीसीने दशकातील टी -20 संघाचा कर्णधार म्हणून निवडले आहे. 

नवी दिल्ली: टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयसीसीने दशकातील टी -20 संघाचा कर्णधार म्हणून निवडले आहे. या संघात सध्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हेदेखील आहेत. दक्षिण आफ्रिकेचा अब्राहम डिव्हिलियर्स आणि वेस्ट इंडिजचा कॅरेन पोलार्ड व्यतिरिक्त ख्रिस गेलला या संघात स्थान मिळालं असून, अफगाणिस्तानचा लेगस्पिनर राशिद खान संघातील एकमेव फिरकीपटू आहे. 

यासह आयसीसीने भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला या दशकाच्या 50 ओवर संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे, ज्याने 28 वर्षानंतर भारत एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणारा एमएस धोनी टी -20 आणि वन डे टीम चा कर्णधार आहे. वन डे संघात महेंद्रसिंग धोनी सोबत आणखी रोहित शर्मा, विराट कोहली दोन भारतीय आहेत. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल स्टार्क यांचीही या संघात निवड झाली आहे. या संघात बांगलादेशचा साकिब अल हसन आणि इंग्लंडचा बेन स्टोक्स हे दोन ऑलराउंडर आहेत. दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर हा संघातील दुसरा स्पिनर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या अब्राहम डीव्हिलियर्सलाही संघात स्थान मिळालं आहे. 

तूमच्या माहीतीसाठी सांगायच झाल तर  एमएस धोनी गेली दोन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. शेवटचा सामना खेळल्यानंतर यावर्षी 15 ऑगस्ट रोजी त्याने निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळला, परंतु इतर कोठेही खेळताना दिसला नाही. नुकतच आयसीसीने एक मतदान केले, ज्यामध्ये लोकांनी आपले मत दिले. यानंतर हा निर्णय पुढे आला आहे.  आयपीएल २०२० मध्ये त्याची टीम चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक होती आणि त्याचा संघ प्लेऑफसाठी देखील पात्र होऊ शकला नाही. 

दशकातील आयसीसी टी -20 संघ: 

महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, ख्रिस गेल, एरॉन फिंच, विराट कोहली, अब्राहम डीव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅरेन पोलार्ड, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.

दशकातील आयसीसी वन डे संघ: 

महेंद्रसिंग धोनी, डेव्हिड वॉर्नर, विराट कोहली, अब्राहम डीव्हिलियर्स, साकिब अल हसन, बेन स्टोक्स, मिशेल स्टार्क, ट्रेंट बाउल्ट, इम्रान ताहिर, लसिथ मलिंगा.

आणखी वाचा:

सुनिल गावस्कर म्हणाले.. विराटच्या अनुपस्थितीत रहाणेची प्रशंसा केली, तर म्हणतील मुंबई कनेक्‍शन मुळे कौतुक -

संबंधित बातम्या