कॅप्टन कोहली बनला 'क्रिकेटर ऑफ द डिकेड', तर कॅप्टन कूल धोनी 'स्पिरिट ऑफ द क्रिकेट'

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या पुरस्कार विजेत्यांमध्ये कोहलीला सर गारफिल्ड सोबर्स यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला. कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्येही दशकातील सर्वोत्तम खेळाडू ठरला. 

मुंबई  :   टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या पुरस्कार विजेत्यांमध्ये कोहलीला सर गारफिल्ड सोबर्स यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला. कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्येही दशकातील सर्वोत्तम खेळाडू ठरला. गेल्या दशकाच्या या कालावधीत कोहलीने त्याच्या ७० आंतरराष्ट्रीय शतकांपैकी ६६ शतके त्याचबरोबर ९४ अर्धशतके झळकावलेली आहेत आणि २०,३९६ धावा केल्या आहेत. सर्वोत्तम क्रिकेटपटू या पुरस्कारासाठी कोहलीला भारताच्याच आर. अश्‍विन आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथचे आव्हान होते. स्मिथ कसोटी क्रिकेटमधला दशकातील सर्वोत्तम फलंदाज ठरला. 

ट्‌वेन्टी- २० मध्ये अफगाणिस्तानचा लेगस्पिनर रशिद खान सर्वोत्तम ठरला; तर 
महिलांमध्ये दशकातील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्कारासाठी ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू इलिसे पेरीला गौरवण्यात आले. सर्वोत्तम एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-२० संघांची यादी कालच जाहीर करण्यात आली होती आणि त्यांच्या नेतृत्वाचा सन्मान महेंद्रसिंग धोनीला देण्यात आला होता.

 

दशकातील सर्वोत्तम पुरस्कार विजेते खेळाडू

  •     विराट कोहली (सर गारफिल्ड सोबर्स सर्वोत्तम क्रिकेटपटू)
  •     इलेसी पेरी (सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू)
  •     स्टीव स्मिथ (सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू)
  •     विराट कोहली (सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू)
  •     इलेसी पेरी (सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू)
  •     रशिद खान (सर्वोत्तम ट्‌वेन्टी- २० क्रिकेटपटू
  •     एलिसे पेरी (सर्वोत्तम ट्‌वेन्टी- २० महिला क्रिकेटपटू)
  •     केली कोएत्झर (सर्वोत्तम असोसिएट संघ क्रिकेटपटू)
  •     महेंद्रसिंग धोनी (सर्वोत्तम खेळभावना क्रिकेटपटू)

संबंधित बातम्या