आयसीसीची क्रिकेट समितीची बैठक; कोहलीने टीका केलेल्या नियमाबाबत होऊ शकते चर्चा

Virat Kohli and DRS
Virat Kohli and DRS

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) क्रिकेट समितीची बैठक आज आयोजित करण्यात येणार आहे. दुबईत होणाऱ्या या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. ज्यात क्रिकेटच्या काही नियमांवरही चर्चा होणार आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील समिती सॉफ्ट सिग्नल आणि अंपायर्स कॉल यांसारख्या वादग्रस्त मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचे समजते. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अंपायर्स कॉलच्या नियमावर यापूर्वीच टीका केली होती. (The ICC Cricket Committee is meeting today to discuss the DRS)

कर्णधार विराट कोहलीने अंपायर्स कॉलचा निर्णय हा मोठा गोंधळ निर्माण करत असल्याचे मत व्यक्त केले होते. अंपायर्स कॉल हा एक अत्यंत गुंतागुंत नियम आहे, ज्यामध्ये बरेच काही मैदानावरील अंपायरच्या निर्णयावर अवलंबून असते. याशिवाय सध्याच्या परिस्थितीला सॉफ्ट सिग्नलचा नियमही चर्चेचा विषय बनून राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या नियमानुसार थर्ड अंपायरकडे पुरेसे पुरावे नसतील तर हाच निर्णय सॉफ्ट सिग्नलच्या नुसार कायम राहतो जो मैदानावरील अंपायरने दिला आहे. 

त्यानंतर, आयसीसीच्या (ICC) या बैठकीत आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनु साहनी यांच्या भविष्यावरही चर्चा होईल. मनु साहनी यांच्यावर आपल्या कर्मचार्‍यांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनु साहनी आपल्या कार्यकाळात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात अडकत असल्याचे मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. याशिवाय, भारतात यावर्षी होणाऱ्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या आयोजनावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीनंतर या स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच समोर येऊ शकते आणि पात्रता व अंतिम सामन्यांची ठिकाणे देखील निश्चित होऊ शकतात. याव्यतिरिक्त, या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना मैदानावर परवानगी देण्यासंदर्भात देखील विचार-विमर्श होऊ शकतो. 

दरम्यान, यापूर्वी विराट कोहलीने (Virat Kohli) डीआरएसच्या अंपायर्स कॉल संदर्भात बोलताना, यामुळे बर्‍याच वेळेस गोंधळाचे वातावरण होत असल्याचे म्हटले होते. पायचीत बाद होण्याचा निर्णय हा पूर्णपणे चेंडू स्टम्पला लागत आहे की नाही या आधारावर असणे गरजेचे असल्याचे मत विराट कोहलीने व्यक्त केले होते. सध्याच्या स्थितीला चेंडू तीन स्टम्प पैकी एकाला तरी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक लागत असेल तरच मैदानातील अंपायर यांच्या निर्णयाच्या विरोधात आव्हान दिले जाऊ शकते.     

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com