New Cricket Rule: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण बदल, 01 ऑक्टोंबरपासून होणार नवे नियम लागू

चेंडू चमकविण्यासाठी चेंडूला थुंकू लावण्यास कायमची बंदी
Cricket
CricketDainik Gomantak

क्रिकेट विश्वात नव्या नियमांची (New Rules in Cricket) घोषणा करण्यात आली आहे. 01 ऑक्टोंबरपासून म्हणजे T20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. खेळाडूंना नव्या नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. डेड बॉल, नो बॉल, पेनल्टी रन्स (No Ball, Dead Ball And Penalty Runs) ते स्ट्राईक घेण्यापर्यंत अनेक नियमांत बदल करण्यात आले आहेत. तसेच, कोरोना काळात सुरू केलेला लाळ वापरण्यासाठी बंदी देखील कायम ठेवण्यात आली आहे. मेर्लेबोन क्रिकेट क्लबने (MCC) हे बदल सूचवले आहेत.

काय आहेत नवीन नियम (What Are New Rules For International Cricket)

1. चेंडू चमकविण्यासाठी खेळाडू चेंडूवर थुंकू लावतात, कोरोना काळात सुरू केलेला हा नियम आता भविष्यातही कायम राहणार आहे.

2. एखादा खेळाडू झेलबाद झाला, तर त्याच्या जागी येणारा नवा फलंदाजच स्ट्राइक घेईल. झेलबाद झालेल्या फलंदाजाने झेल घेण्यापूर्वी मैदान क्रॉस केले असले तरीही नवा फंलदाजच स्ट्राइक घेईल.

Cricket
Digambar Kamat : मुख्यमंत्री गोव्यात परतले, दिगंबर मात्र दिल्लीतच का राहिले?

3. फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाजाला दोन मिनिटांत खेळपट्टीवर यावे लागेल. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यासाठी हा नियम असणार आहे. तर, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दीड मिनिटांचा नियम कायम राहील.

4. गोलंदाजाचा चेंडू खेळपट्टीपासून दूर पडला, तर खेळाडू चेंडू खेळू शकतो, पण, फलंदाजाची बॅट किंवा पाय खेळपट्टीमध्ये असणे आवश्यक आहे. कोणत्याही चेंडूने फलंदाजाला खेळपट्टी सोडण्यास भाग पाडले तर त्याला नो बॉल म्हटले जाईल.

6. मंकडिंग अधिकृत रन आऊट मानले जाईल. जेव्हा नॉन-स्ट्रायकिंग एंडचा बॅट्समन बॉलरने बॉल टाकण्यापूर्वी क्रीजमधून बाहेर येतो आणि बॉलर बेल्स उडवतो तेव्हा त्याला मंकडिंग म्हणतात.

7. पूर्वी, जर एखाद्या गोलंदाजाने पाहिले की स्ट्रायकरने चेंडू टाकण्यापूर्वी एक हालचाल केली आहे, तर तो त्या फलंदाजाला धावबाद करण्यासाठी चेंडू टाकू शकत होता, आता असा चेंडू डेड बॉल मानला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com