ICC: पाकिस्तानचा बाबर आझम ठरला एप्रिल महिन्याचा सर्वोत्तम खेळाडू

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 11 मे 2021

भारताचा आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने हा पुरस्कार पहिल्यांदा पटकावला होता.

आयसीसीच्या(ICC) एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमनं (Babar Azam) नाव कोरलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्द (South Africa) नुकत्याच झालेल्या मालिकेच्या सर्व स्वरुपामध्ये त्याने अतुलनीय कामगिरी केली आहे. बाबरने आफ्रिकेविरुध्दच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांत 94 धावांची खेळी केली आहे. या खेळीमुळे  त्याला 13 रेटींग गुण मिळाले. या गुणासंह त्याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकत एकदिवसीय क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. आफ्रिकेविरुध्दच्या पहिल्या वनडे सामन्यात 274 धावांचा पाठलाग करताना बाबरने 103 धावा काढत संघाला विजय मिळवून देण्यात योगदान दिले आहे.

बाबरने एप्रिल महिन्यात तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 76 च्या सरासरीने 228 धावा काढल्या होत्या. तर 7 टी-ट्वेन्टी सामन्यांमध्ये 305 धावा केल्या. टी-ट्वेन्टी मालिकेत पाकिस्तानने झिम्बाब्वेला 2-1 असे पराभूत केले, या संघाआधी एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी मालिकेत पाकिस्तान संघानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं.

IPL 2021: 'या' 4 देशांनी दिली उर्वरित आयपीएल घेण्याची ऑफर

आयसीसीने या पुरस्काराद्वारे यावर्षी जानेवारीपासून महिन्यातील सर्वोत्कृष्ठ क्रिकेटपटूची निवड करण्यास सुरुवात केली. भारताचा आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) हा पुरस्कार पहिल्यांदा पटकावला होता. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये टीम इंडियाचा फिरकीपटू गोलंदाज रवीचंद्रन अश्विननं (Ravichandran Ashwin) इंग्लंडविरुध्दच्या कसोटी मालिकेत उत्तम कामगिरी केल्यामुळे त्याची महिन्यातील उत्कृष्ठ क्रिकेटर म्हणून निवड करण्यात आाली होती. मार्च महिन्यामध्ये भुवनेश्वर कुमारने (Bhuvenshwar Kumar) या पुरस्कारावर नाव कोरलं होतं. इंग्लंडविरुध्दच्या वन डे आणि टी-ट्वेन्टी मालिकेमध्ये भुवीने  किफायतशीर गोलंदाजी केली होती.

 

संबंधित बातम्या