ICC Ranking 2021: वनडे रॅंकिंगमध्ये कोहलीची ‘विराट’ भरारी

 ICC Ranking 2021: वनडे रॅंकिंगमध्ये कोहलीची ‘विराट’ भरारी
ICC Ranking 2021 Kohlis giant in ODI rankings

नवी दिल्ली: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थान कायम राखले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहा गोलंदाजाच्या क्रमवारीमध्ये चौथ्या स्थानावर घसरला आहे. आज आयसीसीने एकदिवसीय़ क्रमवारी जाहीर केली आहे. इंग्लंडविरुध्दच्या पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्य़ामध्ये अनुक्रमे 56 आणि 66 धावा काढलेल्या कोहलीच्या खात्यात 870 गुणांचा समावेश झाला आहे.

टीम इंडियाचा सलामीवीर आणि उपकर्णधार रोहीत शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमच्या मागे आहे. के.एल राहुलने 31 व्या स्थानावरुन 27 व्या स्थानावर झेप घेतली आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्य़ाने 42 वे स्थान मिळवले आहे. तर विस्फोटक फलंदाज ऋषभ पंतने पहिल्या 100 फलंदाजांमध्ये प्रवेश केला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे पंत नेतृत्व करणार आहे. (ICC Ranking 2021 Kohlis giant in ODI rankings)

इंग्लंडविरुध्दच्या मालिकेमधून विश्रांती घेतलेला बुमराह गोलंदाजाच्या यादीमध्य़े चौथ्या स्थानावर घसरला आहे. त्याच्या खात्यामध्य़े 690 गुण आहेत. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने इंग्लंडविरुध्दच्या अंतिम सामन्यामध्ये 42 धावा देत 3  विकेट घेतल्या असून त्याने गोलंदाजांच्या यादीमध्ये 11  व्या स्थानी उडी घेतली आहे. 10 सप्टेंबर नंतर भुवीने सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तर 'पालघर एक्सप्रेस' म्हणून ओळखला जाणारा शार्दुल ठाकूर 80 स्थानी पोहचला आहे.

फलंदाजाच्या टी-ट्वेन्टी क्रमवारीमध्ये  के.एल. राहुल आणि विराट कोहली अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. अष्टपैलू आणि गोलंदाजाच्या क्रमवारीमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही. तर दुसरीकडे कसोटी क्रमवारीमध्ये फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स नंतर दुसरे स्थान पटकावले आहे.


 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com