ICC Rankings: रोहित शर्माला मागे टाकत पाकिस्तानच्या खेळाडूने मारली बाजी; टॉप 10 मध्ये 2 भारतीय

दैनिक गोमंतक
गुरुवार, 29 एप्रिल 2021

इग्लंचा डेविड मलान 892 अकांसह अव्वल क्रमांकावर आहे.

पाकिस्तानचा फलंदाज  मोहम्मद रिझवान पाच स्थानांच्या फायद्यासह टी-20 (T-20) क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर आला आहे. रिझवानने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इयन मॉर्गनला मागे टाकत टॉप 10 (Top-10) मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी -20 मालिकेत रिझवानची कामगिरी शानदार होती. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी -20 मालिकेत रिझवानने 82 आणि  91 धावांची खेळी खेळून टी -20 क्रमवारीत आपले स्थान सुधारले. आयसीसी टी -20 क्रमवारीत डेव्हिड मलान पहिल्या क्रमांकावर आहे. क्रमवारीत भारताचा विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) पाचव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. या क्रमवारीत पाकिस्तानचा अनुभवी बाबर आझम (Babar Azam) तिसर्‍या क्रमांकावर आहे. (ICC Rankings: The Pakistani player threw Rohit Sharma behind)

AFC Champions League: कोरोनामुळे एफसी गोवाचे परदेशी खेळाडू तातडीने मायदेशी रवाना

इग्लंचा डेविड मलान 892 अकांसह अव्वल क्रमांकावर आहे. ऑस्ट्रलियाचा पिंच 830 अंकांसह दुसऱ्या क्रकंकावर आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमचे 828 अंक असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा विराट कोहली पाचव्या तर के.एल राहुल सातव्या क्रमांकावर आहेत. विराटाचे 742 अंक आहेत तर राहुलचे 743 अंक आहेत. एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानचा बाबर आझम 865 अंकांसह प्रथम क्रमांकावर आहे. भारताचे विराट कोहली आणि रोहित शर्मा अनुक्रमे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.   

इंग्लंडचा कर्णधार मॉर्गन 633 अंकांसह 12 व्या क्रमांकावर आहे. हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा भारताचा फलंदाज रोहित शर्मा 616 अंकांसह 14 व्या क्रमांकावर गेला आहे. टी-20 क्रमवारीत भारताचे 2 (India) फलंदाज आहेत. आयपीएलनंतर भारत कोणताच टी-२० सामना खेळणार नाहीये. संघ आयपीएल संपल्यानंतर इंग्लडला जाणार आहे जिथे विश्व चॅम्पियनशिपचा अंतिम सामना न्यूझीलंड सोबत खेळणार आहे 

 

संबंधित बातम्या