ICC कडून दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचे निलंबन...

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 16 मार्च 2021

आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक न्यायाधिकरणाने सुणावनीनंतर या दोन खेळाडूंना दोषी ठरवले आहे.

भ्रष्टाचार विरोधी कोडचा भंग केल्याप्रकरणी यूएईचे दोन क्रिकेटपटूंना आठ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. मोहम्मद नावेद आणि शायमान अन्वर भट अशी निलंबित केलेल्या क्रिकेटपटूंची नावे आहेत. या दोन क्रिकेटपटूवरील बंदी 16 ऑक्टोबर 2019 पासून सुरु झाली असल्याचे आयसीसीने सांगितले आहे. 2019 च्या टी-20 विश्वकरंडक पात्रता स्पर्धेतील सामन्यादरम्यान या दोन्ही क्रिकेटपटूंची भ्रष्टाचार केला असल्याचे समोर आले आहे.

आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक न्यायाधिकरणाने सुणावनीनंतर या दोन खेळाडूंना दोषी ठरवले आहे. नावेद आणि अन्वर यांच्यावर आयसीसीच्या 2.1.1  आणि 2.4.4 या कलमांचा भंग केल्याचा आरोप आहे.

IndvsEng T20: "मालिका थांबली नाही तर मी आत्महत्या करेन"

आयसीसी इंटीग्रिटी  युनिटचे जनरल मॅनेजर अलेक्स मार्शल म्हणाले, ‘’नावेद आणि अन्वर यूएईसाठी क्रिकेट खेळायचे. नावेद हा संघाचा कर्णधार होता तर अन्वर सलामीवीर होता. या दोन्ही खेळाडूंची अंतरराष्ट्रीय कारकिर्द मोठी आहे. मॅच फिक्सिंगशी नाव जोडल्यानंतर काय होते त्यांना चांगलंच माहीत आहे. असे असूनही हे नावेद आणि अन्वर भ्रष्टाचारामध्ये सामील झाले. त्यांनी संघातील सहकारी आणि यूएईच्या समर्थकांची फसवणूक केली.’’ 

मार्शल पुढेही म्हणाले, ''मला आनंद आहे की, न्यायाधीकरणाने त्यांच्यावर क्रिकेटचे सर्व प्रकार खेळण्याची बंदी घातली. चुकीच्या पध्दतीने जाण्याचा विचार करणाऱ्या खेळांडूसाठी हा इशारा असणार आहे.’’ श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दिलहारा लोकुहेतिगेला आयसीसीने काही दिवसांपूर्वी निलंबित केले होते. टी-10 लीगच्या  भ्रष्टाचाराच्या तीन आरोपांमध्ये लोकुहितगे दोषी आढळला होता. नोव्हेंबर 2019 मध्ये तीन सदस्यीय न्यायाधीकरणाने आरोप लावल्यानंतर लोकुहेतिगेला तिन्ही प्रकरणात दोषी ठरवण्यात आले.
 

संबंधित बातम्या