ICC T20 RANKING: के. एल. राहुलची घसरण; तर विराटची झेप

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 24 मार्च 2021

राहुलची आयसीसीच्य़ा क्रमावारीत एका स्थानाची घसरण झाली आहे. तो पाचव्या स्थानावर आला आहे.

नवी दिल्ली: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या ताज्या टी-ट्वेन्टी क्रमवारीमध्ये एका स्थानाची आगेकूच केली आहे. फलंदाजाच्या यादीत विराट चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाचा सलामीवर के. एल. राहुलला मात्र तोटा सहन करावा लागला आहे. राहुलची आयसीसीच्य़ा क्रमावारीत एका स्थानाची घसरण झाली आहे. तो पाचव्या स्थानावर आला आहे. तर इंग्लंडचा फलंदाज डेव्हीड मलान 892 अंकासह गुणतालिकेत अव्वल आहे.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अ‍ॅरोन फिंच 830  गुणासह दुसऱ्या तर पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम 801 गुणासह तो तिसऱ्या स्थानी आहे. विराट कोहलीच्या खात्यात 762 गुण आहेत. भारत-इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या टी-ट्वेन्टी सामन्यामध्ये विराटने दमदार प्रदर्शन केले. त्यामुळे त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. भारत-इंग्लंड यांच्यात झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत तीन वेळा 70 पेक्षा जास्त धावा काढणारा विराट जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. (ICC T20 RANKING K L Rahuls fall So the giant leap)

INDvsENG 1st ODI : टीम इंडियाचा पाहुण्या इंग्लंड संघावर दमदार विजय 

तर दुसरीकडे के.एल राहुलची बॅट इंग्लंडविरुध्दच्या टी-ट्वेन्टी मालिकेत शांत होती. त्याला चार सामने खेळण्याची संधी मिळाली मात्र आपेक्षेप्रमाणे त्य़ाला उत्तम कामगिरी करता आली नाही. भारताने ही मालिका 3-2 अशी जिंकली. आयसीसीच्या टी-ट्वेन्टी गोलंदाजाच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशिद खानला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या तबरेज शम्सीने रशिदच्या अव्वल स्थानाला धक्का दिला आहे. गोलंदाजाच्या क्रमवारीत शम्सीने 733 गुणासह अव्वल स्थान पटकावले आहे. तर रशिदला 719 गुणावर समाधान मानावे लागले आहे. अष्टपैलूच्या क्रमवारीत इंग्लंडच्या बेन स्टोक्सने पहिल्या तीन खेळाडूमध्ये स्थान मिळवले आहे. अष्टपैलूच्या क्रमवारीत पहिले स्थान अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने पटकावले, तर दुसऱ्या स्थानी बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने स्थान मिळवले आहे.
 

संबंधित बातम्या