ICC T-20 Ranking : शफाली वर्मा अग्रस्थानी कायम

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 31 मार्च 2021

आयसीसीच्या क्रमवारीमध्ये शफालीने 776 रेटिंग गुण मिळवले आहेत.

आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या फलंदाजाच्या टी-ट्वेन्टी क्रमवारीत भारतीय महिला संघाची धडाकेबाज सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा अग्रस्थानी कायम राहीली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्द नुकत्याच झालेल्या टी-ट्वेन्टी मालिकेच्या शेवटच्या सामन्यामध्य़े शफालीने 30 चेंडूमध्ये 60 धावांची विस्फोटक फलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेविरुध्द केलेल्या कामगिरीचा तिला रेटींग गुणांमध्ये चांगलाच फायदा झाला आहे.

आयसीसीच्या क्रमवारीमध्ये शफालीने 776 रेटिंग गुण मिळवले आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीच्या 35 गुणांनी पुढे आहे. शफालीसह स्मृती मनधना आयसीसी क्रमवारीत 6 क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्द स्मृतीने 28 चेंडूमध्ये नाबाद 48 धावा केल्या होत्या. तसेच भारतीय महिला संघातील डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने गोलंदाजाच्या क्रमावारीमध्ये 13 व्या स्थानावर झेप घेतली आहे. तर वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी 15 स्थानांच्या सुधारणासह 56 व्या स्थानी पोहचली आहे.

IPL2021 : हिटमॅनच्या लेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय 'हिट'

तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेची कप्तान सून लुसेने फलंदाजाच्या यादीमध्ये एका स्थानाची झेप घेत 37 व्या स्थानावर पोहचली आहे. तर वेगवान गोलंदाज तूमी सेखुखूनने गोलंदाजाच्या क्रमवारीत 42 वे स्थान प्राप्त केले आहे.

संबंधित बातम्या