ICC Test Rankings : हिटमॅनची मोठी झेप; तर ऑल राउंडर यादीत अश्विन पहिल्या पाचमध्ये  

दैनिक गोमन्तक
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पाहुण्या इंग्लंड संघाचा पराभव केला. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेटच्या  कसोटी प्रकारातील क्रमवारी जाहीर केली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत पाहुण्या इंग्लंड संघाचा पराभव केला. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेटच्या  कसोटी प्रकारातील क्रमवारी जाहीर केली आहे. आयसीसीने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीमध्ये भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने चांगलीच प्रगती केली आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत आणि फलंदाजांच्या क्रमवारीत रविचंद्रन अश्विनने बाजी मारली आहे. 

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर रोहित शर्माची आयसीसीच्या कसोटीतील क्रमवारीत घसरण झाली होती. रोहित शर्मा या क्रमवारीत 23 व्या स्थानावर पोहचला होता. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने धमाकेदार कामगिरी केल्यामुळे ताज्या क्रमवारीत तो 14 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहित शर्माने यावेळेस 9 स्थानांची झेप घेतली आहे. रोहित शर्माने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 231 चेंडू खेळताना 161 धावा केल्या होत्या. यावेळेस त्याने 2 उत्तुंग षटकार आणि 18 चौकार खेचले होते. 

दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

त्याच्यानंतर, भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने देखील आयसीसीच्या रँकिंग मध्ये प्रगती केली आहे. अश्विन अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत सहाव्या क्रमांकावर होता. पण इंग्लंड सोबतच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात लक्षवेधी खेळी केल्यानंतर अश्विन आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहचला आहे. याशिवाय गोलंदाजांच्या यादीत अश्विन सातव्या क्रमांकावर कायम आहे. मात्र त्याचे पॉईंट्स वाढलेले आहेत. त्यानंतर, फलंदाजांच्या क्रमवारीत देखील अश्विनने चांगलीच सुधारणा केली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी अश्विन फलंदाजांच्या यादीत 95 व्या स्थानावर होता. व आता तो 81 व्या नंबरवर पोहचला आहे. 

रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी करताना पहिल्या डावात आणि दुसऱ्या डावात मिळून आठ विकेट्स घेतले. तसेच त्याने दुसऱ्या डावात फलंदाजी करतं 148 चेंडूंचा सामना करत 106 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 1 षटकार आणि 14 चौकार खेचले. अश्विनच्या याच खेळीमुळे भारतीय संघ दुसऱ्या डावात अडीचशे धावांचा टप्पा पार करू शकला होता. तर अश्विनच्या गोलंदाजीमुळे पहिल्या डावात इंग्लंडचा निम्मा संघ माघारी परतल्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात मोठी आघाडी मिळवता आली होती. 

याव्यतिरिक्त, मागील काही सामान्यांपासून सात्यत्यपूर्ण कामगिरी करत असलेल्या रिषभ पंतच्या स्थानात देखील सुधारणा झाली आहे. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात रिषभ पंतने नाबाद राहत अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर रिषभ पंत आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत 13 व्या स्थानावरुन अकराव्या स्थानावर पोहचला आहे. रिषभ पंतची कसोटीतील ही सर्वोत्कृष्ट रँकिंग आहे. त्याने पहिल्या डावात 77 चेंडूंचा सामना करत नाबाद 58 धावा केल्या होत्या. यावेळी त्याने 3 षटकार आणि 7 चौकार खेचले होते.  

संबंधित बातम्या