ICC Test Rankings: रविचंद्रन अश्विनचा जलवा, अष्टपैलूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर कायम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने आपले स्थान अबाधित राखले आहे.
 Ravichandran Ashwin
Ravichandran AshwinDainik Gomantak

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने आपले स्थान अबाधित राखले आहे. गोलंदाज आणि अष्टपैलूंच्या यादीत त्याने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनीही फलंदाजांच्या यादीत अनुक्रमे पाचवे आणि सातवे स्थान कायम ठेवले आहे. रोहितचे 797 आणि कोहलीचे 756 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन (915 गुण) फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. (ICC Test Rankings Team India Veteran Spinner Ravichandran Ashwin Holds On To 2nd Spot In Both Bowlers And All Rounders)

 Ravichandran Ashwin
ICC Test Rankings: टेस्टमध्ये विराट बाबरपेक्षा बेस्टच!

दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जो रुट (900) दुसऱ्या स्थानावर आहे तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (879) स्टीव्ह स्मिथ (877) तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित, डेव्हिड वॉर्नर, कोहली, दिमुथ करुणारत्ने, बाबर आझम आणि ट्रॅव्हिस हेड टॉप 10 मध्ये आहेत. कसोटी गोलंदाजांमध्ये अव्वल 10 मध्ये अश्विन हा एकमेव भारतीय आहे. तो 883 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स अव्वल तर पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्यापाठोपाठ टीम साऊदी आणि जेम्स अँडरसन यांचा क्रमांक लागतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com