ICC U19 World Cup: 22 दिवसांत 48 सामने, जाणून घ्या भारतीय संघाचे वेळापत्रक

2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ ICC U19 World Cup मधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ ठरला
ICC U19 World Cup: 22 दिवसांत 48 सामने, जाणून घ्या भारतीय संघाचे वेळापत्रक
ICC U19 World CupDainik Gomantak

वेस्ट इंडिजमध्ये शुक्रवारपासून आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कपच्या (ICC U19 World Cup) 14व्या आवृत्तीला सुरुवात होत आहे. 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. याशिवाय 2016 मध्ये तो उपविजेता ठरला होता. 14व्या आवृत्तीत, भारताला 15 जानेवारी रोजी गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

19 वर्षांखालील आशिया चषक जिंकून वेस्ट इंडिजमध्ये पोहोचलेल्या यश धुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. या संघाने स्पर्धेत खेळलेले दोन्ही सराव सामने जिंकले आहेत. ICC अंडर-19 विश्वचषक 2022 मध्ये, भारताला 19 जानेवारी रोजी त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमवर आयर्लंड विरुद्ध दुसरा सामना खेळायचा आहे. या स्पर्धेत भारतीय संघ 22 जानेवारीला त्रिनिदाद येथील ब्रायन लारा स्टेडियमवर युगांडाविरुद्ध तिसरा गट सामना खेळणार आहे. स्पर्धेतील गट टप्प्यातील सामने 22 जानेवारीपर्यंत खेळवले जातील. यानंतर 25 जानेवारीपासून प्लेट गटाचे सामने होणार आहेत. अंतिम सामना 5 फेब्रुवारीला होणार आहे. युगांडाचा संघ प्रथमच या स्पर्धेत सहभागी होत असून त्यांना भारत, दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडसह ब गटात स्थान देण्यात आले आहे.

ICC U19 World Cup
ट्रेविस हेडची अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये वापसी

16 संघाची 4 गटात विभागणी

ए- बांग्लादेश, इंग्लैंड, कनाडा, संयुक्त अरब अमीरात

बी- भारत, आयरलैंड, दक्षिण अफ्रीका, युगांडा

सी- अफगानिस्तान, पाकिस्तान, पपुआ न्यू गिनी, जिम्बाब्वे

डी- ऑस्ट्रेलिया, स्कॉटलैंड, श्रीलंका, वेस्टइंडीज

2020 मध्ये न्यूझीलंडमध्ये अंडर-19 वर्ल्ड कपची शेवटची आवृत्ती खेळली गेली होती, जी बांगलादेशने जिंकली होती.

वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या ICC अंडर-19 विश्वचषक 2022 मध्ये, भारताच्या तीन गटाचे सामने IST नुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होतील. भारताव्यतिरिक्त, स्पर्धेतील इतर सामने देखील भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होतील.

ICC U19 World Cup
U19 World Cup: 46 धावांत ऑलआऊट...टीम इंडियाचा सामना करण्यापूर्वीच 'हा' संघ ढेर

ICC U19 World Cup Team India: यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना, आराध्या यादव, राज अंगद बावा, मानव पारख, कौशल तांबे, आर.एस. हंगरगेकर, वासू वत्स, विकी ओस्तवाल, रविकुमार, गरव सांगवान.

राखीव खेळाडू: ऋषी रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अमृत राज उपाध्याय, अमृत राज उपाध्या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.