BCCI चे बल्ले-बल्ले! तिजोरीत येणार 1500 कोटी, सौरव गांगुली-जय शाह जोडी कमाल

आयसीसीने (ICC) बीसीसीआयच्या (BCCI) कराचा बोजा आपल्या वाट्यामधून भरण्याचा निर्णय घेतला आहे.
BCCI चे बल्ले-बल्ले! तिजोरीत येणार 1500 कोटी,  सौरव गांगुली-जय शाह जोडी कमाल
BCCI President Sourav GangulyDainik Gomantak

भारतीय क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा मिळाला आहे. आयसीसीने (ICC) बीसीसीआयच्या (BCCI) कराचा बोजा आपल्या वाट्यामधून भरण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, 2024 ते 2031 दरम्यान भारतात होणार्‍या ICC स्पर्धांमध्ये BCCI च्या कमाईवर जो काही कर असेल तो ICC भरणार आहे. कारण बीसीसीआयला भारत सरकारकडून करात सूट मिळू शकली नव्हती. यामुळे आता भारतीय बोर्डाचे सुमारे 1500 कोटी रुपये वाचणार आसल्याचे मानले जात आहे. भारतीय बोर्ड 2024 ते 2031 या कालावधीत तीन आयसीसी स्पर्धांचे आयोजन करणार आहे. यामध्ये 2026 T20 विश्वचषक, 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) आणि 2031 विश्वचषक यांचा समावेश आहे. आयसीसीने 16 नोव्हेंबर रोजी 2024 ते 2031 या कालावधीतील कार्यक्रमांचे यजमानपद जाहीर केले असून या अंतर्गत भारताला सर्वाधिक तीन स्पर्धांचे यजमानपद मिळाले आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये दोन दशकानंतर क्रिकेटची मोठी स्पर्धा आयोजित होणार आहे. 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद देण्यात आले आहे. 2009 मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकन संघाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 1996 च्या विश्वचषकाचे सह-यजमान असलेल्या पाकिस्तानला देशात अनेक आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करता आलेले नाहीत. चॅम्पियन्स ट्रॉफी शेवटची 2017 मध्ये यूकेमध्ये आयोजित करण्यात आली होती. तब्बल आठ वर्षांनंतर ही स्पर्धा ICC कॅलेंडरमध्ये परत येईल. यजमानांची निवड स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे करण्यात येते. त्यावर मंडळाच्या उपसमितीने देखरेख ठेवली होती. या उपसमितीचे अध्यक्ष मार्टिन स्नेडेन होते, तर त्यात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रिकी स्केरिट यांचाही समावेश होता.

BCCI President Sourav Ganguly
IND vs NZ: रोहित,राहुल पर्वाला आज पासून सुरूवात

2016 T20-2023 विश्वचषकासाठी BCCI 750 कोटी खर्च करेल

भारताने गेल्या सहा वर्षात दोन स्पर्धांचे आयोजन केले असून 2023 च्या विश्वचषकाचे यजमानपद अद्याप मिळालेले नाही. या अंतर्गत भारताने 2016 T20 विश्वचषक, 2021 T20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते. परंतु 2021 चा विश्वचषक कोरोनामुळे UAE मध्ये आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धांसाठीही बीसीसीआयला सरकारकडून करसवलत मिळालेली नाही. 2016 टी-20 वर्ल्ड कप आणि 2023 वर्ल्ड कपमुळे बीसीसीआयला सुमारे 750 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. 2021 चा विश्वचषक UAE मध्ये नसून भारतात झाला असता तर हा तोटा 375 कोटी रुपयांनी वाढला असता.

गांगुली-शहा यांनी सूट देण्याची मागणी केली होती

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 'बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (BCCI President Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Secretary Jai Shah) यांनी आयसीसीशी कर सवलतीच्या मुद्द्यावर चर्चा केली. एवढ्या मोठ्या रकमेचे नुकसान होणे हा बीसीसीआयवर अन्याय असल्याचे ते यावेळी म्हणाले. यात बोर्डाचाही दोष नसल्याचे म्हटले आहे. बाकीच्या क्रिकेट बोर्डांना त्यांच्या सरकारकडून करात सूट मिळते पण भारतात असे नाही. यामुळे आयसीसीने आगामी स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आयसीसीच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष बनले आहेत. त्याने अनिल कुंबळेची जागा घेतली होती. कुंबळे नऊ वर्षे या पदावर राहिले. यापूर्वी गांगुली या समितीचे निरीक्षक होते. क्रिकेट समितीचे काम नियम आणि कायदे करणे हे आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com