World Test Championship: ICCचं ट्विट होतंय जबरदस्त व्हायरल

दैनिक गोमन्तक
बुधवार, 3 मार्च 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. आणि या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना उद्यापासून खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. आणि या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना उद्यापासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आणि याच सामन्याच्या निकालावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेसाठीचा संघ निवडला जाणार आहे. तर न्यूझीलंडचा संघ याअगोदरच  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्या सामन्यापूर्वी आयसीसीने सोशल मीडियावरील ट्विटरवर एक मजेशीर ट्विट केले आहे. आणि आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संदर्भात केलेले हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. 

IPL 2021: आयपीएलच्या वक्तव्यावरून आता डेल स्टेनने केली सारवासारव

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर जून महिन्यात खेळवण्यात येणार आहे. आणि या सामान्यासाठीचा पहिला संघ न्यूझीलंड निवडला गेला आहे. तर न्यूझीलंड विरुद्ध खेळणाऱ्या दुसऱ्या संघाची निश्चित निवड ही भारत आणि इंग्लंड यांच्या उद्यापासून होणाऱ्या सामन्यानंतर पक्की होणार आहे. त्यापूर्वी या सामन्यावरून आयसीसीने एक मजेशीर ट्विट पोस्ट केले आहे. या पोस्ट मध्ये बॉक्सिंग रिंग मध्ये विराट कोहली एका बाजूला आणि जो रूट दुसऱ्या बाजूला लढतीपूर्वी बसल्याचे दिसत आहे. तर जो रूटच्या मागे ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेन पाहायला मिळत आहे. जेणेकरून टीम पेन इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटला लढतीपूर्वी प्रोत्साहित करत असल्याचे दिसत आहे. 

Ind vs Eng: खेळपट्टीवर सुरू झालेल्या वादावर विराट कोहली भडकला

तसेच, आयसीसीने केलेल्या या ट्विटला बॅटरी लोडींग 99 टक्के असा कॅप्शन आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021, भारत आणि इंग्लंड असे हॅशटॅग दिले आहेत. यावरून आयसीसीने एकप्रकारे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा न्यूझीलंड विरुद्ध खेळणारा संघ कोणता असेल हे सांगायचा प्रयत्न केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या सामन्यानंतर इंग्लंडचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. मात्र अजून दोन संघ या स्पर्धेच्या शर्यतीत आहेत. एक म्हणजे भारत आणि दुसरा ऑस्ट्रेलिया. आणि उद्यापासून सुरु होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटच्या कसोटी निकालावरून यातील एक संघ न्यूझीलंड सोबत फायनल मध्ये खेळणार आहे. या सामन्यात भारताचा संघ विजयी झाल्यास किंवा सामना अनिर्णित राहिल्यास टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहचेल. मात्र हा सामना भारताने गमावल्यास टीम इंडिया शर्यतीतून बाहेर पडून ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मध्ये जाईल. आणि नेमके हेच दर्शविण्याचा प्रयत्न आयसीसीने आपल्या या ट्विट मधून केला आहे. 

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना पाहुण्या इंग्लंडच्या संघाने जिंकला होता. मात्र त्यानंतर भारतीय संघाने मालिकेत दमदार पुनरागमन करत दुसरा आणि तिसरा कसोटी सामना आपल्या खिशात घातला होता. त्यामुळे आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये टीम इंडिया 71 च्या पर्सेन्टाइल सह अव्वल स्थानी पोहचला होता. तर 70 पर्सेन्टाइलसह न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आणि ऑस्ट्रेलियाचा संघ 69.2 पर्सेन्टाइल सोबत तिसऱ्या स्थानावर आहे.                             

संबंधित बातम्या