Watch Video: "संघ आणि ट्रॉफीसाठी त्याने..." धोनीबाबत गंभीरचा मोठा दावा, काय म्हणाला पाहा

MS Dhoni ने 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळून ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
MS Dhoni|Gautam Gambhir
MS Dhoni|Gautam GambhirDainik Gomantak

IF MS Dhoni Batted On Number 3 He Would Have Broken Many Records Says Gautam Gambhir:

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने कर्णधारपदामुळे आपल्यातील फलंदाजीचा त्याग केल्याबद्दल एमएस धोनीचे कौतुक केले आहे. गंभीरच्या मते, धोनीने 6 किंवा 7 व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यापेक्षा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असती तर त्याच्याकडे अनेक विक्रम मोडण्याची क्षमता होती.

धोनीला आपण सर्वजण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर म्हणून ओळखतो. मात्र पदार्पणावेळी धोनीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात आघाडीच्या फळीतील फलंदाज म्हणून केली होती.

धोनीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये क्रमांक 3, 4 आणि 5 क्रमांकावर उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. यामध्ये त्याची फलंदाजी सरासरी 50 पेक्षा जास्त आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना, माजी सलामीवीर गौतम गंभीर म्हणाला, "धोनीने भारताला आयसीसी ट्रॉफी मिळवून देण्यासाठी त्याच्या धावांचा त्याग केला. तो वरच्या क्रमांकावर फलंदाजी करत राहिला असता तर त्याने बरेच विक्रम रचले असते."

MS Dhoni|Gautam Gambhir
Asia Cup: 'अशा लोकांना एक थप्पड लगावली पाहिजे...', टीम इंडिया चॅम्पियन झाल्यावर गावसकर असं का म्हणाले?

"जर एमएसने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असती, तर मला खात्री आहे की त्याने अनेक एकदिवसीय विक्रम मोडीत काढले असते. लोक नेहमी एमएसला ट्रॉफीसह पाहतात परंतु माझ्या मते, त्याने संघाच्या ट्रॉफीसाठी त्याच्या आंतरराष्ट्रीय धावांचा त्याग केला. त्याने संघाच्या समतोलासाठी सहाव्या, सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सुरुवात केली.

जर तो कर्णधार नसता तर तो भारताचा 3 क्रमांकावर फलंदाजी करणारा फलंदाज असता, आणि मला वाटते की त्याने जेवढ्या धावा केल्या आहेत त्यापेक्षा जास्त धावा तो करू शकला असता आणि आणखी शतके देखील करू शकला असता."

MS Dhoni|Gautam Gambhir
'या' भारतीय क्रिकेटपटूवर Wasim Akram फिदा, म्हणाला- वर्ल्ड कपमध्ये...

सध्या क्रीडा क्षेत्रासह राजकीय कारकिर्द गाजवत असलेला गौतम गंभीर पुढे म्हणाला,

"एमएस हा भारताचा पहिला यष्टिरक्षक होता जो त्याच्या फलंदाजीने सामन्याचा निर्णय बदलू शकायचा. सर्व यष्टीरक्षक आधी यष्टीरक्षक असतात आणि नंतर फलंदाज, पण एमएस आधी फलंदाज होता आणि नंतर यष्टीरक्षक."

"एमएस धोनीमध्ये, आम्हाला एक यष्टिरक्षक-फलंदाज मिळाला हा भारतीय क्रिकेटसाठी आशीर्वाद होता. जो तुम्हाला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करुन सामने जिंकून द्यायचा, कारण त्याच्याकडे तो पॉवर गेम होता."

धोनीने 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळून ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com