कसोटी क्रिकेट जिवंत ठेवायचंय तर...; सौरव गांगुली यांनी सांगितला फॉर्म्युला

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दोन सामने चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पार पडले आहेत. तर पुढील दोन सामने अहमदाबादच्या नवीन सरदार वल्लभभाई पटेल (मोटेरा) आंतराराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्याचे नियोजन आहे. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. आणि यातील पहिला ऍडिलेड येथील सामना डे नाईट झाला होता.

भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दोन सामने चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पार पडले आहेत. तर पुढील दोन सामने अहमदाबादच्या नवीन सरदार वल्लभभाई पटेल (मोटेरा) आंतराराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्याचे नियोजन आहे. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. आणि यातील पहिला ऍडिलेड येथील सामना डे नाईट झाला होता. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रत्येक कसोटी मालिकेतील एक सामना गुलाबी चेंडूने खेळवणे योग्य राहणार असल्याचे म्हटले आहे. 

ICC World Test Championship फायनलमध्ये न्यूझीलंड सोबत कोण करणार दोन हात?  

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी, क्रिकेटच्या मोठ्या फॉरमॅट म्हणजेच कसोटीमध्ये चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी आणि क्रिकेटच्या खेळाच्या प्रदीर्घ स्वरूपाला जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक मालिकेतील एक सामना हा डे नाईट आयोजित करणे योग्य ठरणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील अहमदाबाद येथे होणारा तिसरा कसोटी सामना हा डे नाईट खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या सामन्यासाठी चाहत्यांना स्टेडियम मध्ये परवानगी देण्यात आलेली आहे. तर सौरव गांगुली यांनी या सामन्यासाठीची तिकिट विक्री यापूर्वीच झाल्याचे नमूद केले आहे. 

सौरव गांगुली यांनी एका मुलाखती मध्ये बोलताना, अहमदाबाद येथे सहा ते सात वर्षांनी कसोटी सामना खेळवण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच अहमदाबाद मध्ये नवीन स्टेडियम उभारण्यात आले असून, भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्याची तिकिटे विकली गेली असल्याची माहिती सौरव गांगुली यांनी मुलाखतीत दिली. तसेच या संदर्भात बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शहा यांच्यासोबत चर्चा करण्यात आल्याचे सौरव गांगुली यांनी सांगितले. याशिवाय मागील वर्षी कोलकाता येथे झालेल्या डे नाईट सामन्याचे उदाहरण ठेवले आहे. आणि त्यामुळे आगामी सामना हा स्टेडियमच्या संपूर्ण क्षमतेने होणे गरजेचे असल्याचे आपण जय शहा यांना म्हटल्याचा खुलासा सौरव गांगुली यांनी मुलाखतीत केला. त्यानंतर टी-ट्वेन्टी सामन्यात देखील प्रेक्षक हजर राहणार असल्याची माहिती सौरव गांगुली यांनी यावेळी दिली. 

याव्यतिरिक्त, भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात प्रेक्षकांना स्टेडियममध्ये उपस्थिती लावण्याची अपेक्षा आपण व्यक्त होती, असे सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले. मात्र त्यावेळेस तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार हा सामना बंद दाराआड खेळवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आणि त्यावेळेस तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने देशात बऱ्याच दिवसानंतर क्रिकेट खेळवण्यात येणार असल्याने पहिल्या सामन्याच्या परिस्थितीनंतर दुसऱ्या सामान्यांपासून दर्शकांना उपस्थितीची परवानगी देण्यात येईल, असे आयोजन करण्यात आल्याची माहिती सौरव गांगुली यांनी दिली. 

त्यानंतर, गुलाबी बॉल टेस्टच्या संभाव्यतेबद्दल बोलताना गांगुली यांनी, प्रत्येक मालिकेतील एक सामना हा डे नाईट आयोजित करणे योग्य राहणार असल्याचे सांगितले. आणि कसोटी क्रिकेट मधील डे नाईट सामना हा मोठा बदल असल्याचे अधोरेखित करून, कसोटी क्रिकेटला जिवंत ठेवण्यासाठी उपयुक्त राहणार असल्याचे सौरव गांगुली यांनी मुलाखतीत सांगितले. व अहमदाबाद मधील प्रेक्षकांनी भरलेले स्टेडियम हे डे नाईट सामन्यासाठी मोठे शिखर ठरणार असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे. 

इंग्लंडच्या पराभवानंतर पीटरसनने टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा; केलं हिंदीत ट्विट!

इतकेच नाही तर, यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेचा चौदावा हंगाम एप्रिल महिन्यात घेण्याचे नियोजन असल्याची माहिती सौरव गांगुली यांनी यावेळी दिली. व या स्पर्धेसाठी प्रेक्षकांच्या स्टेडियम मधील उपस्थिती संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.      

संबंधित बातम्या