Virender Sehwag: 'जर विराट कोहलीने माझ्याशी...', सेहवागचा कोचपदासाठी अर्ज केल्याबद्दल मोठा खुलासा

सेहवागने 2017 साली भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याचे सांगितले आहे.
Virender Sehwag
Virender SehwagDainik Gomantak

Virender Sehwag revealed he applied for Team India's head coach: गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय क्रिकेटचे प्रशिक्षणपद चर्चेत राहिले आहे. नुकतेच भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने खुलासा केला आहे की त्याने 2017 साली भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता.

साल 2017 मध्ये तात्कालिन भारतीय कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात वाद असल्याचे समोर आले होते. त्यामुळे कुंबळेने मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, त्यानंतर रवी शास्त्री यांची भारतीय प्रशिक्षकपदी निवड झाली होती.

Virender Sehwag
IND vs AUS: गोलंदाजांनी रोखलं, सलामीवीरांनी ठोकलं! ऑस्ट्रेलिया भारतात 'असा' पराक्रम करणारा पहिलाच संघ

सेहवागने न्यूज 18 शी बोलताना सांगितले की 'जर विराट कोहली आणि तात्कालिन बीसीसीआय सचिव अमिताभ चौधरी यांनी माझ्याशी संपर्क साधला नसता, तर मी अर्ज केला नसता. आमची बैठक झाली होती. त्यावेळी चौधरी यांनी मला सांगितले की विराट कोहली आणि अनिल कुंबळेमध्ये काहीतरी बिघडले आहे आणि आम्हाला तुला प्रशिक्षकपदी नियुक्त करायचे आहे.'

'त्यांनी मला सांगितले की कुंबळेचा करार चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 नंतर संपणार आहे. त्यांनतर तू संघासह वेस्ट इंडिजला प्रवास करू शकतो.'

याशिवाय सेहवागने त्याला भारतीय संघाचे नियमित कर्णधारपद मिळाले नाही याची खंत नसल्याचेही म्हटले आहे. तो म्हणाला, 'नक्कीच नाही, मी जे काही मिळवले आहे, त्यात मी खूश आहे. नजफगढमधून एका छोट्या कुटुंबातून मी आलो असून मला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली. चाहत्यांकडून खूप प्रेम आणि कौतुक मिळाले आणि जरी मी भारतीय संघाचे कर्णधारपद निभावले असते, तरी मला सारखाच सन्मान मिळाला असता.'

Virender Sehwag
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचे 'मिचेल' फॅक्टर भारतावर भारी! दुसऱ्या वनडेतील पराभवाची 3 कारणे

दरम्यान, सेहवागने भारतीय संघाचे नियमित कर्णधारपद निभावले नसले तरी त्याने 17 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रभारी नेतृत्व केले आहे. त्याने या 17 सामन्यांमधील 10 सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. त्याचबरोबर 6 सामन्यांत पराभव स्विकारलेला आहे. याशिवाय 1 सामना अनिर्णित राहिला आहे.

सेहवागने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 363 सामन्यांमध्ये 431 डावांत 16892 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 38 शतकांचा आणि 70 अर्धशतकांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com