New Rules: इम्पॅक्ट प्लेअर ते पेनल्टी रन, असे आहेत IPL 2023 साठी नवे नियम

आयपीएल 2023 मध्ये काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत, याच नियमांबद्दल जाणून घ्या.
IPL 2023 Rules
IPL 2023 RulesDainik Gomantak

IPL 2023 New Rules: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेला ३१ मार्च म्हणजेच आजपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी सर्व तयारी झाली आहे. दरम्यान, आयपीएलच्या या १६ व्या हंगामासाठी काही नियम नव्याने लागू करण्यात येणार आहे, तर काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याच नियमांबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

डीआरएस रिव्ह्यू

यापूर्वी संघ विकेट तपासण्यासाठी डीआरएसची मागणी करताना अनेकदा दिसायचे. पण आता आयपीएल २023 हंगामादरम्यान खेळाडू वाईड बॉल आणि नो बॉलसाठी देखील रिव्ह्यूची मागणी करू शकतात.

नुकत्याच पार पडलेल्या वूमन्स प्रीमियर लीगमध्येही या नियम वापरण्यात आला होता. त्यावेळी अनेक खेळाडूंना याचा फायदा झाल्याचे दिसून आले.

IPL 2023 Rules
IPL 2023: उत्सुकता शिगेला! सर्व 10 संघांचे कर्णधार अन् खेळाडू, जाणून घ्या एका क्लिकवर

इम्पॅक्ट प्लेअर

बहुचर्चित असलेला महत्त्वाचा नियम म्हणजे इम्पॅक्ट प्लेअर. हा नवा नियमही यंदाच्या आयपीएलमध्ये लागू करण्यात आला आहे. इम्पॅक्ट प्लेअर म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर 12 वा खेळाडू.

म्हणजे नाणेफेकीनंतर दोन्ही संघांना प्लेइंग इलेव्हन घोषित करावी लागणार आहे. याबरोबरच आणखी 4 खेळाडूंची नावे द्यावी लागणार आहेत, त्या 4 खेळाडूंमधील एक जण गरज लागेल तेव्हा प्लेइंग इलेव्हनमधील एका खेळाडूचा बदली खेळाडू म्हणून सामन्यात प्रवेश करू शकतो. पण संघ इम्पॅक्ट प्लेअरचा नियम संघ डावाच्या 14 व्या षटकापूर्वीच करू शकतात. 

हा नियम यापूर्वी सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेत वापरण्यात आला होता.

IPL 2023 Rules
IPL 2023: आजपासून सुरू होणार 10 संघात थरार! कुठे, केव्हा अन् कशा पाहाणार मॅच? घ्या जाणून

नाणेफेकीनंतर प्लेइंग इलेव्हन होणार जाहीर

क्रिकेटमध्ये साधारणत: नाणेफेकीच्यापूर्वी कर्णधारांना प्लेइंग इलेव्हन जाहीर करावी लागते. पण आयपीएल 2023 मध्ये या नियमात बदल करण्यात आला आहे. आता आयपीएल 2023 मध्ये नाणेफेकीनंतर कर्णधार प्लेइंग इलेव्हन जाहीर करू शकतात.

म्हणजेच आयपीएल 2023 मध्ये आता नाणेफेकीवेळी कर्णधार दोन वेगवेगळ्या प्लेइंग इलेव्हनच्या शीट्स बरोबर घेऊन येऊ शकतात. तसेच नाणेफेक झाल्यानंतर नाणेफेकीच्या निकालानुसार कोणती प्लेइंग इलेव्हन खेळवायची याचा निर्णय घेऊन ती शिट सामनाधिकाऱ्यांकडे सुपूर्त करू शकतात. याबरोबरच इम्पॅक्ट प्लेअरचेही नाव घोषित करू शकतात.

IPL 2023 Rules
IPL 2023, GT vs CSK: दोन्ही संघात ऑलराऊंडर्सचा भरणा! पहिल्या सामन्यात कोणाला मिळणार Playing XI मध्ये संधी

षटकांची कमी गती राखल्यास कारवाई

आयपीएलमध्ये यापूर्वी षटकांची गती कमी राखल्यास दंड ठोठावला जात होता. पण यंदा संघांनी निर्धारित वेळत षटके टाकली नाहीत, तर उशीराने टाकलेल्या प्रत्येक षटकासाठी संघांना कारवाई म्हणून केवळ चारच क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवता येणार आहेत.

तसेच यष्टीरक्षकाकडून किंवा क्षेत्ररक्षकाकडून चूकीचे वर्तन झाल्यास तो चेंडू डेड बॉल घोषित केला जाईल, तसेच 5 पेनल्टी धावा दिल्या जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com