हैदराबाद,ईस्ट बंगालसाठी महत्त्वाचा सामना

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

सातव्या मोसमातील प्ले-ऑफ फेरीसाठी हैदराबाद एफसी व ईस्ट बंगाल यांच्यासाठी शुक्रवारी  होणारा सामना अतिशय महत्त्वाचा असेल. 

पणजी ः इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमातील प्ले-ऑफ फेरीसाठी हैदराबाद एफसी व ईस्ट बंगाल यांच्यासाठी शुक्रवारी  होणारा सामना अतिशय महत्त्वाचा असेल. विशेषतः हैदराबादच्या संघासाठी पूर्ण तीन गुण महत्त्वाचे असतील. ईस्ट बंगाल व हैदराबाद यांच्यातील सामना वास्को येथील टिळक मैदानावर खेळला जाईल. मान्युएल मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबादचे सध्या 23 गुण असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. एफसी गोवा व नॉर्थईस्ट युनायटेडचेही तेवढेच गुण असून ते अनुक्रमे तिसऱ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत. हैदराबादने ईस्ट बंगालला नमविल्यास ते तीन गुणांच्या आघाडीसह तिसऱ्या क्रमांकावर येतील. सध्या हा संघ आठ सामने अपराजित असून या कालावधीत तीन विजय व पाच बरोबरी अशी त्यांची कामगिरी आहे.

ISL 2020-21: सिपोविचच्या स्वयंगोलमुळे चेन्नईयीन एफसीला पराभवाचा झटका

ईस्ट बंगालचे मुख्य प्रशिक्षक रॉबी फावलर सध्या निलंबित आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत सलग दुसऱ्या सामन्यात सहाय्यक प्रशिक्षक टोनी ग्रँट यांचे कोलकात्यातील संघाला मार्गदर्शन लाभेल. ईस्ट बंगालचे सध्या 16 सामन्यातून 16 गुण असून ते नवव्या क्रमांकावर आहेत. आयएसएलमध्ये यंदा पदार्पण करणाऱ्या संघाने बाकी चारही सामने जिंकले आणि इतर संघांच्या निकालाचा लाभ मिळाल्यास ईस्ट बंगालला प्ले-ऑफची संधी राहील. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात त्यांना हैदराबादकडून निसटती हार पत्करावी लागली होती.

 

दृष्टिक्षेपात...

- हैदराबादचे मागील 8 लढतीत 3 विजय, 5 बरोबरी

- हैदराबादचे 20, तर ईस्ट बंगालचे 14 गोल

- पहिल्या टप्प्यात हैदराबादची ईस्ट बंगालवर 3-2 फरकाने मात

- हैदराबादचे 16 सामन्यात 5, तर ईस्ट बंगालचे 3 विजय

- हैदराबाद एफसीच्या आरिदाने सांतानाचे 7 गोल

- हैदराबादच्या 6, तर ईस्ट बंगालच्या 3 क्लीन शीट्स

संबंधित बातम्या