पावसामुळे फक्त दोन चेंडूंचाच खेळ

लढतीवरही पावसाचा सावट आहे, अशी माहिती गोवा संघ व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
पावसामुळे फक्त दोन चेंडूंचाच खेळ
Cricket Dainik Gomantak

पणजी: पुदुचेरीतील पावसामुळे 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट (Cricket) स्पर्धेत सोमवारी गोवा आणि रेल्वे (Railway) यांच्यातील लढतीत फक्त दोन चेंडूंचाच खेळ होऊ शकला, त्यामुळे निकाल न लागलेल्या लढतीतून दोन्ही संघांना प्रत्येकी दोन गुण मिळाले.

पुदुचेरी येथील एलिट ब गटातील अन्य लढतीही पावसामुळे (Rain) होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पंजाब, दिल्ली, हरियाना, राजस्थान या संघांनाही प्रत्येकी दोन गुण बहाल करण्यात आले. सध्या पुदुचेरीत पाऊस असल्यामुळे एलिट ब गटातील बाकी लढतीबाबतही प्रश्नचिन्ह आहे.

Cricket
गोव्याच्या क्रिकेट संघ कर्णधारपदी सुयश

रेल्वेविरुद्ध दुपारी उपाहारानंतर नाणेफेक झाली. सामना प्रत्येकी 21 षटकांचा करण्यात आला होता. गोव्याच्या बाजूने कौल लागल्यानंतर त्यांनी रेल्वेस प्रथम फलंदाजीत पाचारण केले. ढगाळ वातावरणात निहाल सुर्लकर याने पहिल्याच षटकात वाईडसह दोन चेंडू टाकल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आणि नंतर खेळ सुरू होऊ शकला नाही.

खेळ थांबला तेव्हा रेल्वेने बिनबाद 5 धावा केल्या होत्या. गोव्याचा गटसाखळीतील पुढील सामना मंगळवारी हरियानाविरुद्ध होईल. या लढतीवरही पावसाचा सावट आहे, अशी माहिती गोवा संघ व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com