IPL 2022: आयपीएल च्या नियमात मोठा बदल; DRS ची वाढली संख्या

आयपीएलचा (IPL 2022) 15 वा सीझन 26 मार्चपासून सुरु होत आहे.
IPL 2022 News
IPL 2022 NewsDainik Gomantak

आयपीएलचा 15 वा सीझन 26 मार्चपासून सुरु होत आहे. यापूर्वीच बीसीसीआयने स्पर्धेचे काही नियम बदलले आहेत. या बदलामध्ये संघांच्या प्लेइंग इलेव्हन ते डीआरएसशी संबंधित नियमांचा समावेश आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, जर एखाद्या संघात कोरोनाशी (Corona) संबंधित प्रकरणे समोर आली तर त्यांची प्लेइंग इलेव्हन बदलली जाऊ शकते. परंतु जर संघ प्लेइंग इलेव्हन तयार करु शकला नाही, तर तो सामना नंतर शेड्यूल केला जाईल. त्यानंतरही सामना होऊ शकला नाही, तर हे प्रकरण तांत्रिक समितीकडे पाठवले जाईल. (In IPL 2022 team will get 4 DRS in the match if corona happens then the match can be rescheduled)

दरम्यान, बीसीसीआय (BCCI) अधिकाऱ्यांनी सांगितले की, जर एखाद्या संघाला 12 खेळाडू (Including 7 Indians) आणि एका पर्यायासह कोरोनामुळे सामन्यासाठी मैदानात उतरवता आले नाही, तर बीसीसीआय हंगामाच्यामध्येच पुन्हा सामना आयोजित करण्याचा प्रयत्न करेल. हे देखील शक्य नसल्यास, हे प्रकरण आयपीएलच्या (IPL 2022) तांत्रिक समितीकडे पाठवले जाईल, ज्यांचा निर्णय अंतिम असणार आहे. (IPL 2022 News updates)

IPL 2022 News
IPL 2022: दिल्ली बरोबर लखनऊ ला मोठा झटका, 26 खेळाडू मुकणार हंगामाला !

आधी काय नियम होता

यापूर्वी आयपीएलमध्ये नियम असा होता की, जर सामना पुन्हा वेळापत्रक देऊनही पूर्ण झाला नाही, तर जो संघ गुणतालिकेत मागे असेल त्याला पराभूत म्हणून दोन गुण दिले जातील.

आता सामन्यात एका डावात 2 म्हणजेच 4 डीआरएस मिळणार

याशिवाय आता संघांना प्रत्येक डावात एका ऐवजी दोन डीआरएस मिळणार आहेत, म्हणजेच प्रत्येक संघाला सामन्यात 4 डीआरएस घेता येणार आहेत. यासोबतच मॅरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) ने या स्पर्धेत अलीकडेच बदललेला झेल नियम लागू करण्याचा निर्णयही बोर्डाने घेतला आहे. एमसीसीच्या नवीन नियमांनुसार, कोणताही फलंदाज झेलबाद झाल्यास, स्ट्राइक बदललेले मानले जाणार नाही. नवीन फलंदाजचं स्ट्राइकवर येईल. मात्र जर झेल ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर असेल तर स्ट्राइक बदलले मानले जाईल.

IPL 2022 News
IPL 2022: यंदाच्या IPL मध्ये 'हे' 10 क्रिकेटर्स करणार संघांचे नेतृत्व

टायब्रेकरबाबतही नियम बदलला

प्लेऑफ आणि फायनलमधील टायब्रेकरचा नियमही बदलण्यात आला आहे. प्लेऑफ किंवा अंतिम सामन्यात, टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर शक्य नसेल किंवा सुपर ओव्हरनंतर पुढील सुपर ओव्हर शक्य नसेल, तर दोन्ही संघांच्या निकालाच्या आधारे सामन्याचा विजेता ठरवला जाईल.

IPL 2022 News
IPL 2022: चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी

पहिला सामना 26 मार्च रोजी होणार

या स्पर्धेतील पहिला सामना 26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सध्या फक्त लीग सामन्यांचे ठिकाण आणि तारखा जाहीर झाल्या आहेत. परंतु प्लेऑफ आणि फायनलची स्थिती स्पष्ट करण्यात आलेली नाही. अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे.

साखळी टप्प्यातील सर्व सामने महाराष्ट्रात होणार

लीग टप्प्यातील सर्व 70 सामने महाराष्ट्रात खेळवले जातील. 55 सामने मुंबईत तर 15 सामने पुण्यात होणार आहेत. 20 सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियम आणि डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर, तर 15 सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहेत. उर्वरित 15 सामने पुण्यातील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहेत.

लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स आपल्या मोहिमेला 28 मार्चपासून सुरुवात करणार आहे. विशेष म्हणजे यांच्यातील सामनाही वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com