Goa Sports: भक्तीचे आव्हान आटोपले

दुसऱ्या फेरीत रशियन खेळाडूविरुद्ध भक्ती कुलकर्णी (Bhakti Kulkarni Goa) पराभव
Goa Sports: भक्तीचे आव्हान आटोपले
Bhakti Kulkarni Goa SportsDainik Gomantak

पणजी: विश्वकरंडक महिला बुद्धिबळ (World Cup women chess) स्पर्धेत झुंजार खेळ केलेल्या इंटरनॅशनल मास्टर भक्ती कुलकर्णीचे (Bhakti Kulkarni) आव्हान अखेर दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले. फिडे मानांकनात सरस असलेली रशियन वूमन ग्रँडमास्टर नतालिया पोगोनिना (Natalija Pogonina) हिने 1.5-05 फरकाने बाजी मारली. (In second round Bhakti Kulkarni lost to a Russian player)

रशियातील सोची (Sochi) येथे स्पर्धा (sports) सुरू आहे. गोमंतकीय भक्तीने (एलो 2391) गुरुवारी दुसऱ्या फेरीतील पहिल्या डावात पोगोनिना (एलो 2469) हिला बरोबरीत रोखले होते. फिडे संकेतस्थळानुसार, दुसरा डाव जिंकत रशियन खेळाडूने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या डावात भक्तीकडे काळी प्यादी होती.

गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डावाची सुरवात किंग्ज इंडियन डिफेन्सने झाली. सुरवातीस पोगोनिनाने वरचष्मा राखला, पण तिसाव्या चालीत भक्तीने प्रतिस्पर्धीस गाठले. त्यानंतर पोगोनिना हिने एक प्यादी जादा असल्याचा फायदा उठवत विजयासाठी प्रयत्न केले. भक्तीने निकराचा बचाव करण्यावर भर दिला, पण अखेरीस रशियन खेळाडू वरचढ ठरली.

Bhakti Kulkarni Goa Sports
विश्वकरंडक महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या डावात भक्तीची बरोबरी

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com