Indian Super League: एफसी गोवासमोर चेन्नईयीनचे कडवे आव्हान

Indian Super League: एफसी गोवाने पहिल्याच लढतीत ईस्ट बंगालला हरवून पूर्ण तीन गुणांची कमाई केली आहे.
FC Goa
FC GoaDainik Gomantak

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात शुक्रवारी (ता. २१) होणारी लढत उत्कंठावर्धक ठरण्याची अपेक्षा आहे. दोन्ही संघ गुणतक्त्यातील स्थान उंचावण्यासाठी प्रयत्नील आहे. सामना चेन्नई येथे खेळला जाईल. चेन्नईयीन एफसी संघाचे दोन लढतीतून चार गुण आहेत. त्यांनी एटीके मोहन बागानला नमविले, तर बंगळूरला बरोबरीत रोखले. एफसी गोवाने पहिल्याच लढतीत ईस्ट बंगालला हरवून पूर्ण तीन गुणांची कमाई केली आहे.

दरम्यान, बंगळूर एफसीविरुद्ध (Bangalore FC) चेन्नईयीनचा मुख्य गोलरक्षक देबजित मजुमदार याला रेड कार्ड दाखविण्यात आले होते, त्यामुळे यजमान संघाला हुकमी गोलरक्षकाच्या अनुपस्थितीत एफसी गोवाच्या आव्हानास सामोरे जावे लागेल. चेन्नईयीनचे प्रशिक्षक थॉमस ब्रडारिक परदेशी खेळाडूपैकी क्वामे कारिकारी आणि पीटर स्लिस्कोकोव्हिच यांच्यापैकी एकाला सुरवातीच्या संघात संधी देऊ शकतात.

FC Goa
Indian Super league: हैदराबादचे नॉर्थईस्टवर वर्चस्व; गुवाहाटीतील सामना 3-0 फरकाने जिंकला

“आम्ही अजूनही संघ तयार करत आहोत आणि तो पूर्ण झालेला नाही. मी खेळाडूंना सांगितले की, आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. आपल्याजवळ असलेली क्षमता आणि सामर्थ्यांसह आपली उद्दिष्टे पूर्ण केली पाहिजेत. आपल्या अनुभवांमधून शिकण्याची इच्छा बाळगली पाहिजे,” असे चेन्नईयीनचे प्रशिक्षक ब्रडारिक यांनी सांगितले

एफसी गोवाचा आत्मविश्वास उंचावला

एफसी गोवाने (FC Goa) मागील सामन्यात ईस्ट बंगालविरुद्ध एदू बेदिया याच्या इंज्युरी टाईम गोलच्या बळावर सामना जिंकला आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. अल्वारो वाझकेझ आणि ब्रँडन फर्नांडिस यांनी आघाडीफळीत धारदार खेळ केला होता. इकेर ग्वार्रोचेना याच्यामुळे एफसी गोवाची आघाडीफळी आणखीनच आक्रमक संभवते. प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी चेन्नईयीनविरुद्ध विजयी लय कायम राखण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

FC Goa
Indian Super League: नाट्यमय लढतीत बंगळूरुनं मारलं मैदान!

दृष्टिक्षेपात लढत

- आयएसएल साखळी फेरीत एफसी गोवा व चेन्नईयीन यांच्यात १६ सामने

- साखळी फेरीत एफसी गोवाचे १०, तर चेन्नईयीनचे ५ विजय, १ बरोबरी

- गतमोसमात एफसी गोवाची चेन्नईयीनवर अनुक्रमे १-० व ५-० फरकाने मात

- मागील सलग ३ लढतीत एफसी गोवा चेन्नईयीविरुद्ध अपराजित, २ विजय व १ बरोबरी

- एफसी गोवा आणि चेन्नईयीन यांच्यातील एकूण २१ सामन्यांत ७९ गोल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com