IND vs SL: सूर्यकुमारनंतर भारतीय गोलंदाजही चमकले, टीम इंडियाचा टी-20 मालिकेवर कब्जा

Team India: तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात भारताने श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव केला.
Team India
Team IndiaDainik Gomantak

India vs Sri Lanka 3rd T20: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात भारताने श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिका 2-1 ने जिंकली आहे.

भारताने मालिकेतील पहिला सामना दोन धावांनी जिंकला, तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने दमदार पुनरागमन करत भारताचा 16 धावांनी पराभव केला. राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 228 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 16.4 षटकांत केवळ 137 धावाच करु शकला.

दरम्यान, श्रीलंकेकडून (Sri Lanka) दासून आणि मेंडिस यांनी सर्वाधिक 23-23 धावा केल्या. याशिवाय डिसिल्वाने 22 आणि असलंकाने 19 धावा केल्या. पथुम 15 धावा करुन बाद झाला. भारताकडून अर्शदीप सिंगने तीन, हार्दिक, उमरान आणि चहलने 2-2 बळी घेतले.

Team India
IND vs SL 3rd T20 Match: कर्णधार पांड्याने 'या' खेळाडूची केली निराशा, तिसऱ्या टी-20 मध्ये...!

दुसरीकडे, भारताकडून सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) सर्वाधिक 112 धावा केल्या. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. ईशान किशन पहिल्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर क्रिजवर आलेल्या राहुल त्रिपाठीने झटपट 35 धावा केल्या. त्यामुळे पॉवरप्लेमध्येच दोन गडी गमावूनही भारताला 53 धावा करता आल्या. त्रिपाठी 35 धावा करुन बाद झाला.

Team India
IND vs SL: तिसरा टी-20 सामना 'हा' खेळाडू गाजवणार, हार्दिक पांड्याचे बनणार ब्रह्मास्त्र !

यानंतर, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 53 चेंडूत 111 धावांची भागीदारी झाली. गिल 46 धावा करुन बाद झाला. हार्दिक आणि दीपक 4-4 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतले. सूर्यकुमारच्या दमदार शतकामुळे भारताने 20 षटकांत 5 गडी गमावून 228 धावा केल्या. अक्षर पटेलने 9 चेंडूत 21 धावा केल्या.

Team India
IND vs SL: 'या' खेळाडूसाठी कर्णधार हार्दिक पांड्या ठरला खलनायक

सूर्यकुमार यादवची शतकी खेळी

या सामन्यात सूर्यकुमार यादव चौथ्या नंबरवर फलंदाजीसाठी आला. जेव्हा तो मैदानावर आला तेव्हा टीम इंडियाने 52 धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर सूर्यकुमार यादवची विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. त्याने 51 चेंडूंचा सामना करत नाबाद 112 धावा केल्या. या शतकी खेळीत सूर्यकुमार यादवने 7 चौकार आणि 9 षटकार मारले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com