
IND vs AUS: भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत लढत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीची संधी दिली होती.
भारतीय संघाचा हा निर्णय योग्य ठरला आणि ऑस्ट्रेलिया अवघ्या 188 धावांवर ऑलआऊट झाला. मात्र यानंतर छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने पहिल्या 6 षटकांतच तीन विकेट गमावल्या. विराट कोहलीही बाद झालेल्या फलंदाजांपैकी एक होता.
मिचेल स्टार्कने अखेर विराट कोहलीवर (Virat Kohli) विजय मिळवला आहे. पहिल्या वनडेत स्टार्कने विराट कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. स्टार्कने 2010 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने कारकिर्दीत पहिल्यांदाच विराटची विकेट मिळवली.
विराटवर विजय मिळवण्यासाठी या गोलंदाजाला 13 वर्षे लागली. आतापर्यंत विराट आणि स्टार्क अनेक मालिका आणि अनेक आयसीसी टूर्नामेंटमध्ये एकमेकांसमोर आले आहेत, पण स्टार्कला विराटची विकेट कधीच मिळवता आली नाही.
189 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या (Team India) फलंदाजांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. ईशान किशन अवघ्या 3 धावा करुन बाद झाला.
तर विराट कोहली 4 आणि सूर्यकुमार यादव खाते न उघडता बाद झाला. यानंतर शुभमन गिल काही काळ थांबला. पण त्यानंतर तोही 20 धावा करुन बाद झाला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, या सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा दिसला.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 188 धावांपर्यंत सर्वबाद केले आहे. भारताकडून शानदार गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धावा करु दिल्या नाहीत आणि एकापाठोपाठ तीन ऑस्ट्रेलियन विकेट घेतल्या.
मोहम्मद सिराजने 3 आणि रवींद्र जडेजाने 2 बळी घेतले, तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना यश मिळाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.