
IND vs AUS Border–Gavaskar Trophy: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने जबरदस्त पुनरागमन करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. भारताकडून शुभमन गिलने शानदार शतक झळकावले.
दरम्यान, टीम इंडियाच्या (Team India) पुनरागमनात गिलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने या सामन्यात त्यांच्या डावात 3 विकेट गमावून 289 धावा केल्या. या सामन्यात शुभमन गिलने 235 चेंडूत 128 धावा केल्या.
यादरम्यान त्याने 12 चौकार आणि 1 षटकार लगावला. शुभमन गिलने या शतकाविषयी खूप काही सांगितले, परंतु यादरम्यान त्याने संघाच्या पुढील प्लॅनबद्दलही सांगितले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) शतक झळकावल्यानंतर गिल म्हणाला की, ऑस्ट्रेलियन गोलंदाज फार आक्रमक खेळत नव्हते. आणि संघाने 3 गडी गमावून जवळपास 300 धावा केल्या आहेत.
आपल्या शतकाबाबत तो म्हणाला की, 'या स्टेडियममध्ये शतक झळकावायला आवडते.' हे त्याचे आयपीएलचे होम ग्राउंड आहे आणि येथे काही धावा केल्याचा त्याला आनंद झाला.
यावेळी बोलताना शुभमन गिलनेही संघाच्या प्लॅनबद्दल सांगितले, तो म्हणाला की, संघाला चौथ्या दिवशी मोठी धावसंख्या करायची आहे. गिलच्या या गोष्टींवरुन स्पष्ट होत आहे की, या सामन्याच्या चौथ्या दिवशी फलंदाजी करताना टीम इंडियाला मोठ्या आघाडीची अपेक्षा असेल.
टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. WTC च्या अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकावा लागेल.
दुसरीकडे, श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका श्रीलंकेच्या संघाने 2-0 ने जिंकली, तर टीम इंडिया WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
अशा परिस्थितीत टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकून डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळवायचा आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.