Sarfaraz Khan: सरफराज खानच्या निवडीबाबत मोठा खुलासा, BCCI चे सिलेक्टर्स म्हणाले...!

Sridharan Sharath On Sarfaraz Khan: टीम इंडिया पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.
Sarfaraz Khan
Sarfaraz KhanDainik Gomantak

Sridharan Sharath On Sarfaraz Khan: टीम इंडिया पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. सध्या निवड समितीने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीच संघ जाहीर केला आहे.

दुसरीकडे मात्र, सरफराज खान हा युवा फलंदाज या संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. सरफराज सातत्याने भारतीय संघाचा दरवाजा ठोठावत आहे. यातच आता, बीसीसीआयच्या एका सिलेक्टर्सने त्याची संघात निवड न करण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

त्यामुळे सरफराजला स्थान मिळाले नाही

टीम इंडियाच्या (Team India) निवड समिती पॅनलचे सदस्य श्रीधरन शरथ यांनी सरफराज खानच्या निवडीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. स्पोर्ट्स स्टार या स्पोर्ट्स मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सरफराज खानबद्दल बोलताना श्रीधरन शरथ म्हणाले की, 'आम्ही नक्कीच त्याचा विचार करत आहोत. आगामी काळात त्याला संधी दिली जाईल. पण, यावेळी संघ निवडताना आपल्याला रचना आणि समतोल या गोष्टींचा विचार करावा लागेल.'

Sarfaraz Khan
Sarfaraz Khan पाठोपाठ धाकट्या भावाचाही डंका, 34 चौकार अन् 9 षटकारांसह ठोकली 'ट्रिपल सेंच्यूरी'

सरफराज खानने हे मोठं वक्तव्य केलं

ऑस्ट्रेलिया (Australia) मालिकेसाठी संघ जाहीर झाल्यानंतर सरफराज खान म्हणाला की, 'बंगळुरुमध्ये रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये जेव्हा मी शतक झळकावले तेव्हा मी सिलेक्टर्संना भेटलो. बांगलादेशात तुला संधी मिळेल, असे मला सांगण्यात आले. त्यासाठी तयार राहा. मी अलीकडेच चेतन शर्मा सरांना भेटलो, त्यांनी मला निराश होऊ नको, असे सांगितले. ते म्हणाले की, चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो. तू खूप जवळ आहेस.'

देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट विक्रम

25 वर्षीय सरफराज खानने आतापर्यंत 37 प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात त्याने 79.65 च्या सरासरीने 3505 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये 2000 हून अधिक धावा केल्यानंतर, फक्त सर डॉन ब्रॅडमन यांचीच त्याच्यापेक्षा चांगली सरासरी आहे. तर 26 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 39.08 च्या सरासरीने 469 धावा केल्या आहेत.

Sarfaraz Khan
Sarfaraz Khan: 'हॅट्स ऑफ'! इग्नोर करणाऱ्या टीम इंडियाच्या सिलेक्टर्सला सर्फराजचं शतकाहसह चोख उत्तर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com