Ind vs Eng 4th Test अक्षर पटेलच्या खेळीने इंग्लंड पहिल्याच डावात अडखळला

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

 4 था कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यातील चौथ्या कसोटी मालिकेचा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.

नवी दिल्ली INDvsENG:  भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यातील  कसोटी मालिकेचा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर त्याचा हा निर्णय चांगलाच फसल्याचे पहायला मिळाले. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 205 धावांवर आटोपला आणि बेन स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा केल्या आहेत. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला पहिला धक्का शुभमन गिलच्या रूपात लागला आहे. त्याला जेम्स अँडरसनने पायचीत केले. 

इंग्लंडला पहिला धक्का डोम सिब्लेच्या रूपात बसला त्याची विकेट अक्षर पटेलने घेतली. सिब्ले 2 धावांवर क्लीन बोल्ड झाला. दुसरा धक्का जॅक क्रोलीच्या रूपात इंग्लंडला बसला. दुसरी विकेटही अक्षर पटेलने घेतली क्रॉलीला मोहम्मद सिराजने 9 धावांवर झेलबाद केले. तिसरी विकेट भारताला मोहम्मद सिराजने मिळवून दिली. तर इंग्लंड चा कर्णधार जो रूटला 5 धावांवर बाद करत एलबीडब्ल्यू केले.

INDVsENG : Video बेन स्टोक्स सिराजला असं काय म्हणाला,ज्यामुळे विराट कोहलीचा पारा चढला 

चौथा धक्का इंग्लंडला जॉनी बेयरस्टोच्या रूपात लागला. त्याने मैदानात टिकून राहण्याचा पुर्ण प्रयत्न केला पण 28 धावांवर मोहम्मद सिराजने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. बेन स्टोक्सने 55 धावा केल्या आणि त्याला वॉशिंग्टन सुंदरने दुसऱ्याच बॉलवर एलबीडब्ल्यू केले. सहावी विकेट आर अश्विनने घेतली. अश्विनने ओली पोपला 29 धावांवर माघारी धाडले.

WIvsSL: किरॉन पोलार्डने 6 चेंडूत ठोकले 6 षटकार; व्हिडीओ तुफान व्हायरल 

इंग्लंडला बेन फॉक्सच्या रूपात सातवी विकेट गमवावी लागली. त्याने 35 धावा केल्या आणि अक्षर पटेलच्या चेंडूवर वृषभ पंतने त्याला झेलबाद केले. यांनंतर अक्षर पटेलनेच भारताला आठवी विकेट मिळवून दिली. वृषभ पंतने डॅनियल लॉरेन्सला  46 धावांवर असतांनाच स्टंपआउट केले. डोमिनेक बेस 3 धावांवर बाद झाला. जॅक लीच 7 धावांवर बाद झाला तर अँडरसन 10 धावांवर नाबाद होता. 

नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने मागील कसोटी सामन्यात दोन बदल केल्याचे सांगितले. स्टुअर्ट ब्रॉड आणि जोफ्रा आर्चरला संघातून वगळण्यात आले. तर डॅनियल लॉरेन्स आणि डोमिनेक बेस यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. भारताने एक बदल केला आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला स्थान देण्यात आले आहे. 

 

संबंधित बातम्या