IND vs ENG: टीम इंडियाच्या गोलंदाजीची कमाल; इंगलंडचा संघ संकटात

IND Vs ENG Bowlers of team India showed superb game
IND Vs ENG Bowlers of team India showed superb game

चेन्नई : दुसर्‍या दिवशी लंचपर्यंत इंग्लंडच्या संघाने चार विकेट गमावून 39 धावा केल्या आहेत. बेन स्टोक्स क्रीजवर आहे. दुपारच्या जेवणापूर्वी डॅनिल लॉरेन्स अश्विनच्या शेवटच्या बॉलवर बाद झाला इंग्लंडची सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर रोरी बर्न्स पहिल्याच षटकात खाते न उघडता इशांत शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच्यानंतर दुसरा सलामीवीर डोम सिब्ली काही खास कामगिरी करू शकला नाही. 16 धावा बनवून तो अश्विनचा बळी ठरला.

 इंग्लंडच्या संघाला त्यांचा कर्णधार जो रूटकडून मोठ्या आशा होत्या पण आज तो केवळ 6 धावा करू शकला. ही अक्षर पटेलची आंतरराष्ट्रीय कसोटीतील पहिली विकेट होती. त्याआधी दुसर्‍या दिवशी भारताचा डाव 329 धावांवर आटोपला. भारताकडून रोहित शर्माने 161, अजिंक्य रहाणेने 67 आणि रिषभ पंतने नाबाद 58 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. त्यांच्याशिवाय ऑली स्टोनने तीन विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com