IND Vs ENG: भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल; टिम इंडियाला पहिला झटका

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

रत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे

चेन्नई: भारत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. या सामन्यात डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल भारताकडून पदार्पण केले आहे. चेन्नई येथे इंग्लंडकडून 227 धावांनी पहिला सामना गमावल्यानंतर टीम इंडिया सध्या मालिकेत 0-1ने पिछाडीवर आहे. या सामन्याचा निकाल भारतासाठी खूपच अर्थपूर्ण आहे, कारण या सामन्यात पराभूत होणे केवळ कसोटी मालिकाच गमावणार नाही तर विश्व कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जाण्याची संधी गमावणार आहे. 

भारतूय कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या संघात तीन बदल केले आहे. यामध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय अक्षर पटेल आ णि कुलदीप यांना वॉशिंगटन सुंदर आणि शाबाज नदीम यांच्याजागी संघात स्थान देण्यात आले आहे.

रवींद्र जडेजाच्या जागी आज पहिल्या कसोटीतच अक्षर पटेलने पदार्पण केले आहे. दुखापतीतून सावरून दुसऱ्या कसोटीत पदार्पणासाठी पटेल सज्ज झाला आहे. दुसरा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी अक्षर पटेलला पदापर्णाची टोपी देत संघात स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर कुलदीप यादवने तब्बल दोन वर्षानंतर भारतीय संघात पदार्पण केले आहे.

भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. शुबमन गिलला खाते न उघडताच परत जावे लागले आहे. ओली स्टोनने चेंडू गिलला एलबीडब्ल्यू आउट केले आहे.आता  पुजारा रोहित शर्माला साथ देण्यासाठी मैदानात उतरला आहे. टीम इंडियाने एकही रन मिळवला नाही आणि इन फॉर्म ओपनर गमावला आहे.

रोहित, रहाणेकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा

टीम इंडिया प्रतिकार करण्याचा प्रयत्न करीत आहे. पुजारा आणि रोहित शर्मा यांनी ब्रॉडच्या ओवरमध्ये प्रत्येकी एक चौकार ठोकला आहे. चार ओवरमधील चौकारनंतर एका विकेटच्या नुकसानासोबत भारताची धावसंख्या 10 आहे. रोहित शर्माकडून भारताकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

 

 

संबंधित बातम्या