Ind vs Eng: चौथ्या कसोटीत सामन्यात इंग्लंडचा दारुण पराभव

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 6 मार्च 2021

भारत- इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटीत सामन्यात इंग्लंडला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भारत- इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटीत सामन्यात इंग्लंडला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने एक डाव राखत इंग्लंडचा 25 धावांनी पराभव केला आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात 160 धावांची आघाडी घेतल्य़ानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांना आर. अश्वीन आणि अक्षर पटेलच्या फिरकीचा सामना जास्त निकराने करता आला नाही. दोघांनी प्रत्येकी पाच विकेट घेत भारताच्या नावावर ऐतिहासीक विजयाची नोंद केली. या सामन्यासह भारताने इंग्लंड विरुध्दच्या चार कसोटी सामन्यांची मालिका 3-1 ने जिंकली आहे. आणि विशेष म्हणजे भारताने या विजयासह भारत आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पात्र झाला आहे.

INDvsENG: कालच्या बाचाबाचीनंतर बेन स्टोक्सने विराट कोहलीला पाठवलं माघारी

तिसच्या दिवशी खेळ सुरु झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांनी इंग्लंटच्या गोलंदाजासमोर विकेट मिळवण्यासाठी आव्हान निर्माण केलं होतं. या दोघांनी मिळून 100 धावांची पाटनर्शिप केली. मात्र अक्षर 43 धांवावर असताना रन आऊट झाला होता. त्याची अर्धशतक करण्याची संधी हुकली होती. तर वॉशिंग्टन याच्याकडे शतकी खेळी करण्याची संधी होती. परंतु इशांत आणि सिराज बाद झाल्यानंतर त्याची शतक करण्याची संधी हुकली. वॉशिंग्टन 96 धावांवर नाबाद राहिला. 365  धावांवर ऑल आऊट झालेल्या भारतीय संघाने 160 धावांची आघाडी घेतली होती.
 

संबंधित बातम्या