IND vs ENG:  शार्दुलला ‘मॅन ऑफ द मॅच’ मिळायला हवी होती; विराटनं भुवीचंही घेतलं नाव

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 29 मार्च 2021

शार्दुल ठाकूरला मॅन ऑफ द मॅच आणि भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द सिरिज' साठी निवड करण्यात आली नाही.

पुणे: भारत-इंग्लड यांच्यात पार पाडलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्य़ामध्ये भारताने विजय संपादन करत एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातली. शेवटपर्यंत रंगलेल्या सामन्यामध्ये इंग्लंडचा फलंदाज सॅम करनने जिद्दीने खेळी करत विजय आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला  यश आले नाही. तर दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या सामन्यामध्ये उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. विशेषत: शार्दुलने गोलंदाजीबरोबरच फलंदाजीमध्ये सुध्दा उत्तम कामगिरी केल्यामुळे शार्दुलला ‘मॅन ऑफ द मॅच’ मिळण्याची शक्यता होती. मात्र 'मॅन ऑफ मॅच' चा किताब इंग्लंडचा फलंदाज सॅम करनला मिळाल्याने विराटने आश्चर्य व्यक्त केलं.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये इंग्लंडकडून खेळताना सॅम करनने नाबाद 95 धावांची खेळी केली. त्यामुळे करनला मॅन ऑफ द मॅच आणि तीन वनडे क्रिकेट सामन्यामध्ये 299 धावा करणाऱ्या इंग्लंडच्या जॉनी बेअरेस्टोला 'मॅन ऑफ द सिरीज' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मात्र यावर बोलताना टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आश्चर्य व्यक्त केले आहे. (IND vs ENG Shardul should have got Man of the Match Virat also took Bhuvis name)

INDvsENG: हार्दिक पांड्याने हात जोडून मागितली टिम इंडियाची माफी; व्हिडिओ व्हायरल

‘’शार्दुल ठाकूरला 'मॅन ऑफ द मॅच' आणि भुवनेश्वर कुमारला 'मॅन ऑफ द सिरिज' साठी निवड करण्यात आली नाही. मला आश्चर्य वाटतयं. विपरित परिस्थिती असताना गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली,’’ असं कोहली म्हणाला.

“जेव्हा दोन सर्वश्रेषठ संघामध्ये क्रिकेटचा सामना रंगतो. तेव्हा चित्तथरारक खेळ बघायला मिळतो. यामध्ये कोणत्याही संघाला सामना गमवायचा नसतो. सॅमने चांगली फलंदाजी करत शेवटपर्यंत सामन्यामध्ये संघाला विजय मिळवून देण्यासाठी टिकवून ठेवले. भारतीय गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली, मात्र अनेक खेळाडूंनी झेलही सोडले. त्यावर मी नाराज आहे. जितके झेल आपण सोडतो तेवढे आपण सामन्यामध्ये खाली जातो. आणि विशेषत: अनेकवेळा सोडलेले झेल महागात सुध्दा पडतात,” असही विराट यावेळी म्हणाला.

 

संबंधित बातम्या