Ind vs Eng T20: टीम इंडियाची खराब सुरुवात, 20 धावात 3 गडी बाद!

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मार्च 2021

भारत- इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या कसोटी मालिकेनंतर भारत विरुध्द इंग्लंड टी-20  सामन्यांच्या  मालिकेलाम आज सुरुवात झाली आहे.

भारत- इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या कसोटी मालिकेनंतर भारत विरुध्द इंग्लंड टी-20  सामन्यांच्या  मालिकेलाम आज सुरुवात झाली आहे. पहिल्या टी-20 सामन्यामध्ये इंग्लडचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफक जिकंत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दिवस-रात्र सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांची धडाकेबाज फलंदाजी पाहण्याची क्रिकेट चाहत्यांना असतानाच टीम इंडियाला सुरुवातीलाच 3 मोठे धक्के बसले आहेत. 

सलामीला के. एल. राहुल आला मात्र 1 धावसंख्या काढून बाद झाला. दुसऱ्या षटकात बसलेल्या धक्क्यातून सावरत असतानाच कर्णधार विराट कोहली जॉर्डनच्या बॉलिंगवर खाते न खोलताच झेल बाद झाला. य़ानंतर शिखर धवन रिषभ पंतसोबत डाव सावरेल असं दिसत असतानाच शिखर धवनने 12 चेंडूत फक्त  4 धावा काढून तंबूत परतला. इंग्लडचा गोलंदाज वूडने त्याचा त्रिफळा उडवला.
 

संबंधित बातम्या